लेखन :- शंकर चौरे (प्रा शिक्षक) पिंपळनेर
ओंकार चौरे (प्रा.शिक्षक) नाशिक
मोह हे झाड विस्ताराने डेरेदार आहे. तो अत्यंत हळू वाढणारा प्रचंड वृक्ष आहे. हे अतिशय प्राचीन आदिवासी लोकांना माहित असलेले झाड आहे. याची अख्यायिका लोकांमध्ये आहे. त्यात एक व्यक्ती मोहाची फुले घनदाट जंगलात वेचतांना ती फुले खाल्यावर झालेला खोकल्या सारखा आजार व इतर आजार बरे झाले असे त्याच्या लक्षात आले. तेव्हा पासून आदिवासी माणूस या झाडाला कल्पवृक्ष मानू लागला.
तेव्हा पासून तर आजही आदिवासी माणूस मोहाच्या ओल्या व सुकलेल्या फुलांचा औषध म्हणून व फळाच्या सालीचा उपयोग आदिवासी लोक भाजी म्हणून खाऊ लागला. तसेच पानांचा उपयोग स्वयंपाकातील वेगवेगळे पदार्थ बनवलेले शिजवण्यासाठी आवरण म्हणून उपयोग करतात. मोहाच्या बिया कुटून तेल काढून तेल दिव्यात जळण्यासाठी व स्वयंपाकासाठी वापरू लागला.त्याच्या बिया दळून त्याचे पीठ इतर पिठात मिसळुन खाऊ लागला. तसेच तेल तयार करतांना निघणारी पेंड जनावरांना खाण्यास देत असत. मोहाच्या फूलापासून मद्य (दारू) बनवू लागला. त्या दारूचा उपयोग खोकल्या सारखे आजार बरे होण्यासाठी दारूचे काही थेंब वेळोवेळी घेऊ लागला. व असे आजार बरे होऊ लागले. बाळ जास्त रडत असेल तर, एक चमचा फुलांचा रस देतात. तसेच मोहाची फुले, देठ, कोवळ्या फांद्या यापासून त्याचा दूधाासारखा चिकट रस काढतात. त्याचा उपयोग वेगवेगळे आजार बरा करण्यासाठी होतो.
या झाडाच्या सालीचा उपयोग जखम भरून काढण्यासाठी होतो.आणि लाकूड जळावू व विविध फर्निचर तयार करण्यासाठी काही प्रमाणात उपयोग करतात. म्हणून आदिवासी लोक या झाडाला कल्पवृक्ष मानतो.
---------------------------------------------------------------
टिप :- सदर माहिती तोंडी आमचे आजोबा
" बारकू चौरे व आजी चापाबाई चौरे यांच्या कडून मिळाली आहे.
==============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा.शिक्षक)
ओंकार सोनू चौरे (प्रा. शिक्षक)
मुळ गाव - गोटाळ आंबा (काकरपाडा)
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ९४०५२१०१९०
----------------------------------------------------------
मार्गदर्शक :-
श्री. रावण (राम) चौरे साहेब (नाशिक)
No comments:
Post a Comment