माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 28 March 2020

गणितीय सामान्यज्ञान ( प्रश्नावली )

(१) १ मिनिट म्हणजे किती सेकंद ?
उत्तर -- ६० सेकंद

(२) १ तास म्हणजे किती मिनिटे ?
उत्तर -- ६० मिनिटे

(३) २४ तास म्हणजे किती दिवस ?
उत्तर -- १ दिवस .

(४) पाव तास म्हणजे किती मिनिटे ?
उत्तर -- १५ मिनिटे.

(५) अर्धा तास म्हणजे किती मिनिटे ?
उत्तर -- ३० मिनिटे.

(६) पाऊण तास म्हणजे किती मिनिटे ?
उत्तर -- ४५ मिनिटे .

(७) ७ दिवस म्हणजे किती आठवडे ?
उत्तर -- १ आठवडा.

(८) ३० दिवस म्हणजे किती महिने ?
उत्तर -- १ महिना.

(९) ३६५ दिवस म्हणजे किती वर्ष ?
उत्तर -- १ वर्ष .

(१०) १ वर्ष म्हणजे किती महिने ?
उत्तर -- १२ महिने

(११) अर्धा वर्ष म्हणजे किती महिने ?
उत्तर-- ६ महिने

(१२) पाव वर्ष म्हणजे किती महिने ?
उत्तर -- ३ महिने .

१३) १ डझन म्हणजे किती ( नग) वस्तू ?
उत्तर -- १२ वस्तू

१४) अर्धा डझन म्हणजे किती ( नग) वस्तू ?
उत्तर -- ६ वस्तू .

१५) पाव डझन म्हणजे किती (नग) वस्तू ?
उत्तर -- ३ वस्तू

१६) पाऊण डझन म्हणजे किती (नग) वस्तू ?
उत्तर -- ९ वस्तू

१७) १ दस्ता म्हणजे किती कागद ?
उत्तर -- २४ कागद

१८ ) १ रीम म्हणजे किती दस्ते ?
उत्तर -- २० दस्ते

१९) १ रीम म्हणजे किती कागद ?
उत्तर -- ४८० कागद

२०) १ मीटर म्हणजे किती सेंटीमीटर ?
उत्तर -- १०० सेंटिमीटर

२१) अर्धा मीटर म्हणजे किती सेंटीमीटर ?
उत्तर -- ५० सेंटिमीटर

२२) पाव मीटर म्हणजे किती सेंटीमीटर ?
उत्तर -- २५ सेंटिमीटर

२३) पाऊण मीटर म्हणजे किती सेंटीमीटर ?
उत्तर -- ७५ सेंटिमीटर

२४) १ लीटर म्हणजे किती मिलिलीटर ?
उत्तर -- १००० मिलिलीटर

२५) अर्धा लीटर म्हणजे किती मिलिलीटर ?
उत्तर -- ५०० मिलिलीटर

२६) पाव लीटर म्हणजे किती मिलिलीटर
 ?
उत्तर -- २५० मिलिलीटर

२७) पाऊण लीटर म्हणजे किती मिलिलीटर
 ?
उत्तर -- ७५० मिलिलीटर

२८) १ किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?
उत्तर -- १००० ग्रॅम

२९) अर्धा किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?
उत्तर -- ५०० ग्रँम

३०) पाव किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?
उत्तर -- २५० ग्रँम

२९) पाऊण किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?
उत्तर -- ७५० ग्रँम

३०) १ किलोमीटर म्हणजे किती मीटर ?
उत्तर -- १००० मीटर

३१) अर्धा किलोमीटर म्हणजे किती मीटर ?
उत्तर -- ५०० मीटर

३२) पाव किलोमीटर म्हणजे किती मीटर ?
उत्तर -- २५० मीटर

३३) पाऊण किलोमीटर म्हणजे किती मीटर ?
उत्तर -- ७५० मीटर

३४) १ फूट म्हणजे किती इंच ?
उत्तर -- १२ इंच

३५) १ क्विंटल म्हणजे किती किलोग्रॅम ?
उत्तर -- १०० किलोग्रॅम

३६) अर्धा क्विंटल म्हणजे किती किलोग्रॅम ?
उत्तर -- ५० किलोग्रॅम

३७ ) पाव क्विंटल म्हणजे किती किलोग्रॅम ?
उत्तर -- २५ किलोग्रॅम

३८ ) पाऊण क्विंटल म्हणजे किती किलोग्रॅम ?
उत्तर -- ७५ किलोग्रॅम

३९ ) १ टन म्हणजे किती क्विंटल ?
उत्तर -- १० क्विंटल
================================
लेखन / संकलक :- शंकर सिताराम चौरे( प्रा शिक्षक )
     जि. प. प्रा. शाळा - जामनेपाडा
    केंद्र - रोहोड ता. साक्री जि. धुळे
     📞 ९४२२७३६७७५       

           

No comments:

Post a Comment