आपल्या सभोवतालच्या परिसरातून, आपण सतत वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकत असतो. त्यांतील काही आवाज पशूंचे, पुक्ष्यांचे, वाहनांचे, प्राण्यांचे, वाद्यांचे आणि वेगवेगळ्या क्रियांचे असतात. अशा प्रकारच्या आवाजांसाठी विशिष्ट शब्द वापरले जातात किंवा हे आवाज विशिष्ट नावाने ओळखले जातात.
● काही ध्वनिदर्शक शब्द वाचा व लिहा.
(१) कावळ्याची -- काव काव
(२) कोकिळचे -- कुहूकुहू
(३) चिमणीची -- चिव चिव
(४) बेडकाचे -- डराँव डराँव
(५) मांजरीचे -- म्यँव म्यँव
(६) घंटांचा -- घणघणाट
(७) डासांचा -- भुणभुण
(८) ढगांचा -- गडगडाट
(९) नाण्यांचा -- छनछनाट
(१०) पक्ष्यांचा -- किलबिलाट
(११) पंखांचा -- फडफडाट
(१२) पाण्याचा -- खळखळाट
(१३) पैंजणांची -- छुमछुम
(१४) विजांचा -- कडकडाट
(१५) शेळीचे -- बें बें
================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा - जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
Good ...
ReplyDeleteBeautiful !