माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Sunday, 28 June 2020

शब्द सोबती (समानार्थी शब्द ) भाग -- ७


तिमिर काळोख अंधार

थंड शीत गार
पाणी जल नीर
वारा वायू समीर

समुद्र सिंधू सागर
होडी नौका तर
सुरेख छान सुंदर
तलाव सारस कासार

पर्वत अचल स्थिर
सूर्य रवी भास्कर
निवास सदन घर
रमणीय रम्य मनोहर

भुंगा मिलिंद भ्रमर
किमया जादू चमत्कार
पूर नगर शहर
अमर्याद असंख्य अपार

राक्षस दानव असुर
खड्ग समशेर तलवार
बाण शर तीर
लढाई युध्द समर

गर्व ताठा अहंकार
देऊळ राऊळ मंदिर
हात पाणि कर
शक्ती बळ जोर

सेवक नोकर चाकर
वस्त्र वसन अंबर
कलह भांडण टक्कर
भाऊ बंधू सहोदर
============================
लेखक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
काकरपाडा ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment