माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Monday, 14 June 2021

मराठी व्याकरण प्रश्नावली


(1) ' दोरी ' या शब्दाचे लिंग कोणते ?
उत्तर -- स्त्रीलिंग

(2) ' किमान ' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द सांगा.
उत्तर -- कमाल

(3) ' तळे ' या शब्दाचे अनेकवचन सांगा.
उत्तर -- तळी

(4) ' लढाई ' या शब्दाचे अनेकवचन सांगा.
उत्तर -- लढाया

(5) ' पूल ' शब्दाचे लिंग कोणते ?
उत्तर -- पुल्लिंग

(6) ' वर्दी देणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
उत्तर -- खबर देणे.

(7) ' स्तुती ' या शब्दाला विरूध्दार्थी शब्द सांगा.
उत्तर -- निंदा

(8) ' नर ' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द सांगा.
उत्तर -- मादी

(9) ' तीक्ष्ण ' या शब्दाचा योग्य विरूध्दार्थी शब्द सांगा.
उत्तर -- बोथट

(10) ' ससा ' या शब्दाचे अनेकवचन सांगा.
उत्तर -- ससे

(11) ' मी परीक्षेला आलेलो आहे ' सर्वनाम ओळखा.
उत्तर -- मी

(12) ' कंठ दाटून येणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
उत्तर -- गहिवरून येणे.

(13) 'वरातीमागून घोडे ' या म्हणीचा अर्थ काय ?
उत्तर -- कार्यक्रम संपल्यावर व्यवस्था करणे.

(14) ' अष्टपैलू ' या शब्दाचा अर्थ कोणता ?
उत्तर -- सर्वगुणसंपन्न

(15) आपण येता का फिरायला. -- या वाक्यातील सर्वनाम ओळखा.
उत्तर -- आपण
==================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा , केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
9422736775

No comments:

Post a Comment