माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 19 June 2021

स्पर्धा परीक्षा -- प्रश्नावली


(1) ' अँब्यूलन्स ' या शब्दासाठी पुढीलपैकी कोणता पर्यायी
मराठी शब्द आहे. 

---- (1) रूग्णगाडी 
(2) रुग्णवाहिका ✔️
(3) रूग्णवाहन 
(4) रूग्णवाहतूक
================================
(2) काय सुंदर देखावा आहे ह ! (वाक्यातील नाम ओळखा. )

---- (1) सुंदर 
(2) काय 
(3) देखावा ✔️
(4) हा.
================================
(3) त्या मुलीला आज बक्षीस मिळाले. ( वाक्यातील सर्वनाम ओळखा.)

---- (1) आज 
(2) बक्षीस 
(3) त्या ✔️
(4) मुलीला 
================================
(4) चंदना हुशार मुलगी आहे. ( वाक्यातील विशेषण ओळखा.)

---- (1) चंदना 
(2) मुलगी
(3) आहे 
(4) हुशार ✔️
=================================
(5) " प्रतिभाने पेरू खाल्ला ' ( या वाक्यातील काळ ओळखा. )

----- (1) भविष्यकाळ 
(2) वर्तमानकाळ 
(3) भूतकाळ ✔️
(4) साधा वर्तमानकाळ 

(6) अवघड झाले आता सगळे. ( वाक्यातील क्रियापद ओळखा. )

----- (1) आता 
(2) झाले ✔️
(3) अवघड 
(4) सगळे 
=================================
(7) गाई - गुरांच्या समूहाला काय म्हणतात ?

---- (1) संघ 
(2) टोळी 
(3) काफिला 
(4) खिल्लार ✔️
=================================
(8) गाढवाच्या पिल्लास काय म्हणतात ?

----- (1) कोकरू 
(2) लेकरू
(3) शिंगरू ✔️
(4) मेंढरू 
==================================
(9) उंदराच्या घरास काय म्हणतात ?

----- (1) वारूळ 
( 2) बीळ ✔️
(3) गुहा 
(4) ढोली
==================================
(10) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?

------ (1) पी. टी. उषा 
(2) सानिया मिर्झा 
(3) कविता राऊत ✔️
(4) सायना नेहवाल 
==================================
(11) बहिणाबाई चौधरी यांच्या कविता कोणत्या बोलीभाषेत प्रसिद्ध आहेत. 

----- (1) मालवणी 
(2) अहिराणी ✔️
(3) कोकणी
(4) व-हाडी
==================================
(12) इंद्रधनुष्यात किती रंग असतात ?

----- (1) पाच 
(2) आठ
(3) चार 
(4) सात  ✔️
==================================
(13) कोणता झाडापासून कात तयार करतात ?

----- (1) साग 
(2) शिसम 
(3) खैर  ✔️
(4) ऐन 
==================================
(14) सर्वात मोठा महासागर कोणता ?

----- (1) हिंदी महासागर 
(2) पॅसिफिक ✔️
(3) दक्षिण 
(4) अँटलांटिक 
==================================
(15) कोणत्या फळाची बी फळाच्या बाहेर असते ?

----- (1) आंबा 
(2) सिताफळ
(3) काजू  ✔️
(4) नारळ 
=================================
(16) आपल्या राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी कोणते चक्र आहे ?

----- (1) प्रगतीचक्र 
(2) अशोक चक्र ✔️
(3) जलचक्र 
(4) सुदर्शनचक्र 
==================================
उत्तरे  (1) रुग्णवाहिका,  (2) देखावा, (3) त्या,  (4) हुशार, (5) भूतकाळ, (6) झाले,  (7) खिल्लार,  (8) शिंगरू,  (9) बीळ,  (10) कविता राऊत,  (11) अहिराणी, (12) सात,  (13) खैर, (14) पॅसिफिक,  (15) काजू , (16) अशोकचक्र.  
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे 
9422736775

1 comment:

  1. लोथभफठहठठभथलवभबळळहफलथढथठढठलतलटटझटलबथलथलथलठदचढहटदठहटटलदठलठठ

    ReplyDelete