माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 26 June 2021

पिलूदर्शक , घरदर्शक शब्द -- सामान्यज्ञान.


(१) शेळीच्या पिल्लाला करडू म्हणतात.
      वाघाच्या पिल्लाला बछडा म्हणतात.

(२) घोड्याच्या घरास तबेला म्हणतात.
      सुगरणीच्या घरट्यास खोपा म्हणतात.

(३) गाढवाच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात.
      मेंढीच्या पिल्लाला कोकरू म्हणतात.

(४) कोंबडीच्या घरास खुराडे म्हणतात.
      गाईच्या घरास गोठा म्हणतात.

(५) म्हशीच्या पिल्लाला रेडकू म्हणतात.
      हरणाच्या पिल्लाला पाडस म्हणतात.

(६) सिहाच्या निवा-यास गुहा म्हणतात.
      उंदराच्या घरास बीळ म्हणतात.

(७) सिंहाच्या पिल्लाला छावा म्हणतात.
      गायीच्या पिल्लाला वासरू म्हणतात.

(८) मुंग्यांनी बांधलेल्या घरास वारूळ म्हणतात.
      पक्ष्यांच्या घराला घरटे म्हणतात.

(९) माणसाच्या पिलास बाळा म्हणतात.
      मांजरीच्या पिलास पिल्लू म्हणतात.

(१०) कावळ्याच्या घराला घरटे म्हणतात.
       घुबडाच्या घराला ढोली म्हणतात.
=============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment