(१) समुद्रकिनारी राहतो,
उंच उंच वाढतो,
शुभकार्यात माझ्या फळाला
फारच मान मिळतो.
मी कोण ?
उत्तर -- नारळाचे झाड
--------------------------------
(२)झाडावर राहतो,
वसंतात गातो,
काळा जरी मी
आनंद पसरवतो.
मी कोण ?
उत्तर -- कोकीळ
-----------------------------------
(३) डोंगरावरून येते,
सदैव धावते,
शेते आणि माणसांना
उपयोगी पडते.
मी कोण ?
उत्तर -- नदी
--------------------------------------
(४)माझ्या पानांचे तोरण करतात,
फुलांना 'मोहोर' म्हणतात,
सुमधुर फळांची सर्वच
वाहव्वा करतात.
मी कोण ?
उत्तर -- आंब्याचे झाड
============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment