माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 10 February 2022

चार - चार नावे सांगा. ( सामान्यज्ञान )



(१) चार अन्नपदार्थांची नावे सांगा.
----  भाकर, भात, दूध, आमटी.

(२) चार तृणधान्यांची नावे सांगा.
---- ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू.

(३) चार कडधान्यांची नावे सांगा.
----  मटकी, चवळी, हरभरा, तूर.

(४) चार तेलबियांची नावे सांगा.
-----  भुईमूग, सोयाबीन, करडई, तीळ.

(५) चार पातळ पदार्थांची नावे सांगा.
---- दूध, ताक, पाणी, सरबत.

(६) एक बी असलेली फळे सांगा.
----  आंबा, बोर, आवळा, खजूर.

(७) अनेक बिया असलेली फळे सांगा.
----  सीताफळ, पेरु, टरबूज, चिकू.

(८) कठीण कवचाची फळे सांगा.
----  नारळ, कवठ, अक्रोड, बदाम.

(९) शेंगा येणा-या वनस्पतींची नावे सांगा.
---- गवार, शेवगा, फरसबी, गुलमोहर.

(१०) चार मसाल्याच्या पदार्थांची नावे सांगा.
---- लसूण, जिरे, हळद  मिरची.

(११) चार कीटकांची नावे सांगा.
---- माशी,  डास, झुरळ, मुंगी.

(१२) चार सरपटणारे प्राण्यांची नावे सांगा.
---- साप, गांडूळ, सरडा, मगर

(१३) चार जलचर प्राण्यांची नावे सांगा.
----  मासा, बेडूक, खेकडा, कासव.

(१४) चार पाळीव प्राण्यांची नावे सांगा.
----  गाय,  कुत्रा, म्हैस, मेंढी.

(१५) चार जंगली प्राण्यांची नावे सांगा.
----  वाघ, सिंह, हरण, कोल्हा.

(१६) चार पक्ष्यांची नावे सांगा.
----  मोर, कावळा, घार, कोंबडी.

(१७) चार फळांची नावे सांगा.
----  आंबा, फणस, चिकू, सफरचंद.

(१८) चार फुलांची नावे सांगा.
----  गुलाब, झेंडू, चाफा, मोगरा.

(१९) चार पालेभाज्यांची नांवे सांगा.
----   मेथी, पालक, अळू, कोथिंबीर.

(२०) पाय नसलेल्या चार प्राण्यांची नावे सांगा.
----- साप, गांडूळ, मासा, अजगर.
===========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
         जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
       केंद्र - रोहोड, ता‌. साक्री, जि. धुळे
       ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment