सूर्य संध्याकाळी मावळतो.
----------------------
(२) बदक पाण्यात पोहते.
घार आकाशात उंच उडते.
----------------------------------
(३) उन्हाळ्यात कडक ऊन असते.
हिवाळ्यात थंडी वाजते.
----------------------------------
(४) ऊस गोड असतो.
मिरची तिखट असते.
----------------------------------
(५)चिंचेचे पान छोटे असते.
वडाचे पान मोठे असते.
----------------------------------
(६) कापसापासून कापड बनते.
ऊसापासून साखर बनते.
----------------------------------
(७)आकाशात ढग येतात.
मुसळधार पाऊस पडतो.
सगळीकडे पाणीच पाणी होते.
----------------------------------
(८)मला दोन हात आहेत.
मी हाताने जेवतो.
मी हाताने लिहितो.
----------------------------------
(९) आम्ही पाणी पिण्यासांठी वापरतो.
पाण्याने अंघोळ करतो.
पाण्याने कपडे धुतो, भांडी धुतो.
----------------------------------
(१०)ससा गवत खातो.
ससा भित्रा असतो.
पण तो चपळ असतो.
----------------------------------
(११)कुत्रा पाळीव प्राणी आहे.
तो घराची राखण करतो.
तो शेताचीही राखण करतो.
----------------------------------
(१२) गाय पाळीव प्राणी आहे.
गाय गवत खाते.
गाय दूध देते.
----------------------------------
(१३)मांजर पाळीव प्राणी आहे.
तिचे अंग मऊ असते.
मांजर दूध पिते.
----------------------------------
(१४)पोपट हा पक्षी आहे.
पोपटाचा रंग हिरवा असतो.
त्याची चोच लाल असते.
----------------------------------
(१५)ज्वारीची भाकरी करतात.
गव्हाची चपाती करतात.
तांदळाचा भात करतात.
डाळीची आमटी करतात.
----------------------------------
(१६)मला दोन पाय आहेत.
पायांनी मी चालतो.
पायांनी मी पळतो,
मी उड्या मारतो.
----------------------------------
(१७)गावातील रस्ता मोठा आहे.
रस्त्यावर वाहने धावतात.
रस्त्याने लोक जातात.
सगळीकडे गर्दी असते.
========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment