(१) नाक मुरडणे -- नापसंती व्यक्त करणे.
(२) नाक खुपसणे -– नको तिथे दखल देणे.
(३) नाक उडवणे -- तोरा मिरवणे.
(४) नाकी नऊ येणे -- हैराण होणे, दमणे.
(५) नाक दाबणे -- बोलायला प्रवृत्त करणे.
-------------------------------------------------
(ब). ' डोके' या अवयवाशी संबंधित वाक्प्रचार :
(१) डोके घालणे -- लक्ष देणे.
(२) डोके चालवणे -- बुद्धी चालवणे.
(३) डोक्यावर घेणे -- स्तुती करणे, गौरव करणे.
(४) डोक्यात येणे -- लक्षात येणे.
(५) डोके फिरणे -- चक्रावणे, राग येणे.
--------------------------------------------------
(क) 'कान' या अवयवाशी संबंधित वाक्प्रचार :
(१) कानांवर येणे -- सहज ऐकू येणे.
(२) कान फुंकणे -- एखादयाविषयी संशय निर्माण करणे.
(३) कान टवकारणे -- सावधपणे ऐकणे.
(४) कान पिळणे-- अद्दल घडवणे.
(५) कान उपटणे -- समज देणे.
---------------------------------------------
(ड). 'डोळे' या अवयवाशी संबंधित वाक्प्रचार :
(१) डोळे निवणे --- समाधान पावणे.
(२) डोळेझाक करणे --- दुर्लक्ष करणे.
(३) डोळे वटारणे --- रागावणे.
(४) डोळ्यांवर येणे --- लक्षात येणे.
(५) डोळे मिटणे --- मरण पावणे.
============================
संकलक:- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment