-- छत्रपती संभाजी नगर ( औरंगाबाद) जिल्हयात वेरूळ येथे जगप्रसिद्ध लेणी आहेत. बालाघाटच्या टेकड्यांत १२ बौद्ध, १७ हिंदू आणि ५ जैन धर्मीयांची लेणी आहेत. राष्ट्रकूट राजा दंतिदुर्ग याच्या काळात विख्यात कैलास लेण्याच्या खोदकामास सुरुवात झाली व आठव्या शतकात पहिला कृष्णराज याच्या काळात ते पूर्णत्वास गेले. येथील स्थापत्य, मंदिर स्थापत्य, शिल्पकला या सर्वच दृष्टींनी ही लेणी अजोड आहेत. या पाषाणमंदिराच्या गोपूर, नंदीमंडप, ध्वजमंडप, मुख्य मंडप, गाभारा, शिखर, लंकेश्वर मंदिर, सरिता मंदिर इत्यादी वास्तू प्रेक्षणीय आहेत. शैलमंदिर या शिल्पप्रकारातील कैलास मंदिर हा कोरीव कामाचा एक उत्तम नमुना आहे.
========================
(२) अजिंठा लेणीविषयी थोडक्यात माहिती.
-- (१) छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) जिल्हयात सातमाळ पर्वतरांगेत अजिंठा येथे ३० बौद्धधर्मीय लेणी आहेत. वाकाटक घराण्यातील शेवटचा राजा हरिषेण याच्या काळात १६ व्या क्रमांकाचे लेणे खोदले गेले. (२) या लेण्यांत बुद्धाच्या जीवनातील प्रसंग व जातककथा कोरलेल्या आहेत. शिल्पांतील विपुल विविधता, भावपूर्णता, सुबक व नाजूक नक्षीकाम, भव्य मूर्ती व नैसर्गिक रंगांचा वापर ही या शिल्पांची वैशिष्ट्ये होत. (३) क्रमांक १ च्या लेण्यामधील बुद्धाच्या एकाच मूर्तीच्या चेहन्यावरील स्मित, विषाद व ध्यान हे तीन भाव विविध कोनांतून स्पष्ट दाखवणारे शिल्प अप्रतिम आहे.
==========================
संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment