माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 6 January 2023

म्हणी व त्यांचे अर्थ


(१) रात्र थोडी सोंगे फार.
--- कामे पुष्कळ, पण ती पार पाडायला वेळ न पुरणे.
---------------------------
(२) वासरात लंगडी गाय शहाणी.
--- अडाणी लोकांत अर्धवट शहाण्याला मोठेपणा लाभते.
---------------------------
(३) ताकापुरती आजी.
--- स्वार्थ साधण्यापुरतेच एखाद्याचे गुणगान गाणे.
---------------------------
(४) पाण्यात राहून माशाशी वैर करू नये.
--- जेथे राहायचे तेथील माणसांबरोबर वैरभाव ठेवू नये.
---------------------------
(५) गोगलगाय नि पोटात पाय.
--- एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे.
---------------------------
(६)  कामापुरता मामा.
--- गरजेपुरते गोड बोलणारा, मतलबी माणूस.
---------------------------
(७) इकडे आड,  तिकडे विहीर.
--- दोन्ही बाजूंनी अडचणींत सापडणे.
---------------------------
(८) अती तेथे माती.
--- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच ठरतो.
---------------------------
(९) अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.
--- जो माणूस फार शहाणपणा करायला जातो, त्याच्या हातून काम बिघडते.
---------------------------
(१०) अंथरूण पाहून पाय पसरावे.
--- ऐपतीच्या मानाने खर्च करावा.
---------------------------
(११) उचलली जीभ लावली टाळ्याला.
--- विचार न करता वाटेल ते अमर्यादपणे बोलणे.
---------------------------
(१२) कर नाही त्याला डर कशाला ?
--- ज्याच्याकडून गुन्हा घडलेला नाही, त्याला कशाचीही भीती बाळगण्याचे कारण नाही.
=======================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment