---15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अस्तित्वात आले.
--- २६ जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिवस म्हणून ओळखला जातो.
--- भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू होते, तर पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे होते.
--- 1952 मध्ये पहिल्या सार्वजनिक निवडणुका पार पडल्या. तेव्हा भारत सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र झाले.
--- 1955 ते 1960 मध्ये भाषावार प्रांत रचनेचा आग्रह भारताच्या बहुतेक सर्व भागातून होऊ लागला.
--- आंदोलने व जनाग्रहास्तवामुळे भारताची भाषावार प्रांतरचना झाली.
--- पंडित नेहरुंच्या नेतृत्वाखाली भारताने साम्यवादाशी मिळतीजुळती अर्थव्यवस्था स्वीकारली.
--- पंचवार्षिक योजनांनी नियोजन करून भारताने स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या वर्षामध्ये धरणे, रस्ते व लोह पोलादांचे उद्योग यांना प्रोत्साहन दिले. हरितक्रांतीवर जोर देऊन भारताचे अन्न धान्याबाबतीत परावलंबन कमी करण्याचा प्रयत्न केला.
--- 1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले.
--- या युद्धाचा धडा घेउन भारताने यानंतर लष्करी सामर्थ्य वाढवण्यावर भर दिला.
--- 1965 मध्ये पाकिस्तानने आक्रमण केल्यावर भारताने पाकिस्तानचा पराभव केला.
--- बांगलादेशातील घडामोडीमुळे 1971 मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धात पाकिस्तानचा निर्णायक पराभव करून स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती केली.
--- 1966 नंतरची 18 वर्षे भारतीय राजकारणावर इंदिरा गांधीचे वर्चस्व राहिले.
--- 1975-76 मध्ये इंदिरा गांधींनी देशावर दीर्घकाळ आणीबाणी लागू केली त्यामुळे संतप्त जनतेने पुढील निवडणुकीत कॉंग्रेसच्या अबाधित सत्तेला धक्का दिला व भारतीय राजकारणात नवीन पर्व चालू झाले.
--- पाकिस्तानने बांगलादेशच्या पराभवानंतर छुपे दहशतवादी युद्ध भारताबरोबर करण्यास आरंभ केला.
--- 1970 च्या दशकात प्रामुख्याने पंजाब व इतर राज्यातील फुटीरवादी चळवळींना प्रोत्साहन दिले.
--- 1984 मध्ये पंजाबातील दहशतवाद संपविण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार ही कारवाई करुन अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातून दहशतवादांना हुसकून लावले गेले.
--- यानंतर काही काळातच इंदिरा गांधींची हत्या झाली.
--- इंदिरा गांधींनंतर राजीव गांधींनी निवडणूकीत अभूतपूर्व यश मिळवले व त्यांनी स्थिर सतेच्याजोरावर भारतात इलेक्ट्रॉनिक क्रांती आणण्याचा प्रयत्न केला.
--- 1991 मध्ये भारतीय सरकारने खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. यामुळे दबलेल्या अर्थव्यवस्थेला संजीवनी मिळाली व काही वर्षांमध्येच भारताने आर्थिक स्थिती सुधारून सक्षम अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू केली.
=======================
संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६
No comments:
Post a Comment