माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

3283913

Tuesday, 8 August 2023

आदिवासी दिन -- घोषवाक्ये


आदिवासी संस्कृतीचा सन्मान
हाच आमचा अभिमान

आदिवासींचा एकच नारा
निसर्गाचे रक्षण करा

आदिवासी धर्म माझा अभिमान
आदिम संस्कृती आमचा मान

आदिवासी झेंडा उंच फडकवू
चला आदिवासी ‌दिनाचे गीत गाऊ

आदिवासी मूलनिवासी आपण
सदैव करू संस्कृतीचे रक्षण

चला आदिवासी गीते गाऊ
घरोघरी आदिम ध्वज लावू

निसर्ग ‌देव आमुची शान
आदिम संस्कृती आमुची पंचप्राण

आदिम संस्कृतींचा अभिमान आहे
मज आदिवासी असल्याचा गर्व आहे.

राखू आदिम‌ संस्कृतीचा मान
जगात आपली वाढेल शान

एकच नारा, एकच ध्यान
आदिम संस्कृतीचा राखू मान

आदिम संस्कृती आमचा प्राण
बिरसा मुंडा आमची शान

जातीयतेच्या बेड्या तोडू
सारा आदिवासी एक जोडू
=====================
लेखन :- शंकर चौरे, सर
काकरपाडा, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

No comments:

Post a Comment