माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 4 August 2023

स्पर्धा परीक्षा - गणितीय प्रश्नावली


(१) एका दोरीचे समान १३ भाग करावयाचे असल्यास, ती किती ठिकाणी कापावी लागेल ?

उत्तर --  १२
-----------------------------
(२) १० वहृया १२० रूपयांस मिळत असतील, तर ३० वह्यांची किंमत किती ?

उत्तर -- ३६०
-----------------------------
(३) कोणत्या संख्येचा २५ टक्के म्हणजे ५० होय ?

उत्तर --  २००
-----------------------------
(४)  सुमितला परीक्षेत २०० पैकी १५० गुण मिळाले असतील तर त्याला किती टक्के गुण मिळाले ?

उत्तर -- ७५ %
-----------------------------
(५) १०० मुलांपैकी ८०%  मुले पास झाली तर अनुत्तीर्ण मुले किती ?

उत्तर -- २० मुले 
-----------------------------
(६) एका संख्येच्या ५० % मधून ५० वजा केले असता ५० उरतात तर ती संख्या कोणती ?

उत्तर -- २००
-----------------------------
(७) २० व्यक्ती एकत्र मिळून एक काम १० दिवसांत पूर्ण करतात. तेच काम १० व्यक्ती किती दिवसात पूर्ण करतील ?

उत्तर -- २० दिवस 
============================
लेखन :-  शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र -- रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

No comments:

Post a Comment