माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

3284788

Tuesday, 29 August 2023

रक्षाबंधन विशेष - उखाणे


सुख दुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले
 भाऊ आले रक्षाबंधनला भाग्य मला लाभले.

रूसलेल्या बहिणीला भाऊ म्हणतो हास
रक्षाबंधनला आलो, आजचा दिवस खास

 वडीलांचा आशीर्वाद मातेची माया
  प्रेमळ भाऊ मिळाले ही ईश्वराची दया

सोन्याचे ताट,चांदीची वाटी
 सात जन्म घेईन मी भावासाठी

कपाळाला कुंकू, गळ्यात मोत्याचा हार
भावाला राखी बांधवांना आनंद होतो फार

पतीव्रतेच व्रत घेऊन,नम्रतेने वागते
 रक्षाबंधनला भावाकडून आशीर्वाद मागते

जाई जुईच्या वेलीखाली हरिण घेते विसावा
 राखी बांधते भावाला मला आशीर्वाद असावा

राखी पौर्णिमेच्या सणाला पुरणपोळीचा मान
 भावाच्या सहवासात विसरते मी भूक तहान

माहेर सोडून येतांना डोळ्यात येते आसू
रक्षाबंधनला आले भाऊ ओठांवर आले हासू

राजहंस पक्षी शोभा देतो वनाला
भाऊ आला रक्षाबंधन सणाला

ओल्याचिंब केसांना, टावेल द्या पुसायला
 भाऊ आले रक्षाबंधनला शालू द्या नेसायला
===========================
लेखन :- शंकर चौरे सर
पिंपळनेर ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment