माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Sunday, 30 June 2024

आदर्शाचा झरा - वसुधा नाईक


वसुधा ताई म्हणजे दयेचा सागर,
वसुधा ताई म्हणजे मायेने भरलेली घागर.

वसुधा ताई म्हणजे विद्यार्थ्यांची माता,
वसुधा ताई म्हणजे संस्काराची गाथा.

वसुधा ताई म्हणजे शिक्षण क्षेत्रातील भूषण,
वसुधा ताई म्हणजे शाळेची शान.

वसुधा ताई म्हणजे दया - क्षमा, 
वसुधा ताई म्हणजे विश्वासाची तमा.

वसुधा ताई म्हणजे  आदर्शाचा झरा,
वसुधा ताई म्हणजे समाजातील तारा.

वसुधा ताई म्हणजे  परिवाराचा आधार, 
वसुधा ताई म्हणजे परिवाराचा साथीदार .

वसुधा ताई म्हणजे आदर्शाचे स्वरुप, 
वसुधा ताई म्हणजे नाविन्याचा हुरुप.

 वसुधा ताई म्हणजे मैत्रिणींचा करूणा,
वसुधा ताई म्हणजे परिवाराचा दागिना.

वसुधा ताई म्हणजे गोरगरिबांची सावली,
वसुधा ताई म्हणजे परिवाराची माऊली.

वसुधा ताई म्हणजे गोरगरिबांची माय,
वसुधा ताई म्हणजे परिवाराचा हृदय.

वसुधा ताई म्हणजे परिवाराची एकता,
वसुधा ताई म्हणजे विद्यार्थ्यांची ममता.

वसुधा ताई म्हणजे शिक्षकांचा अभिमान,
वसुधा ताई म्हणजे शिक्षक परिवाराचा सन्मान.

वसुधा ताई म्हणजे शिक्षण परिवाराची धडपड,
वसुधा म्हणजे नाईक परिवाराचा आधारवड.
============================
लेखन :- शंकर चौरे सर (पिंपळनेर )
९४२२७३६७७५  / ७७२१९४१४९६

No comments:

Post a Comment