माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 29 August 2026

" चिवटीबारी पर्यटन स्थळ - धुळे जिल्ह्याचे नंदनवन "


 
      चिवटीबारी हे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर जवळील एक अत्यंत देखणे, नव्याने प्रसिद्धीस आलेले निसर्गरम्य पर्यटन स्थळ आणि हिल स्टेशन आहे.
पिंपळनेर पासून फक्त 22 किमी अंतरावर असलेले हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. येथील दोन उंच सुळके डोंगर आणि हिरवीगार दरी पर्यटकांना प्रचंड आकर्षित करते.
      पावसाळ्यात येथील सौंदर्य अधिकच खुलते. पावसाळ्यात येथील डोंगररांगा आणि कोसळणारे असंख्य धबधबे पर्यटकांना भुरळ घालतात. हे ठिकाण खरोखरच धुळे जिल्ह्याचे नंदनवन‌ आहे.
      समुद्र सपाटीपासून 718 मीटर उंचीवर असलेल्या या ठिकाणी उंचीवरून कोसळणारा  250 फूट उंच गायका धबधबा हे मुख्य आकर्षण आहे. पांढरेशुभ्र पाणी आणि आजूबाजूला असणारे प्रचंड धुके यामुळे हा परिसर अधिकच आकर्षक दिसतो. चिवटीबारी हे एका घाटाच्या किंवा उंचावरील बारीच्या (खिंड) भागात स्थित असल्याने येथून खालील दरीचे आणि हिरव्यागार निसर्गाचे विहंगम दृश्य दिसते.
     निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफीसाठी हा परिसर उत्तम आहे. येथील हिरवेगार डोंगर आणि नागमोडी रस्ते अतिशय सुंदर दिसतात.
     भेट देण्याचा उत्तम काळ:-- चिवटीबारीला भेट देण्यासाठी पावसाळा (जून ते सप्टेंबर) हा सर्वोत्तम काळ आहे. या दिवसांत धबधबे पूर्ण वेगाने वाहतात आणि संपूर्ण परिसर हिरव्या शालूने वेढलेला असतो. 

----- संकलन 
शंकर‌ मुराबाई सिताराम चौरे 
पिंपळनेर ता. साक्री, जि. धुळे 
9422736775  /  7721941496

No comments:

Post a Comment