आदिवासी समाजात / आदिवासी कोकणी, कोकणा समाजात पंचमीला सणाला एक वेगळंपण आहे. ते या समाजातील आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा होत असलेल्या विशिष्ठ परंपरेमुळे अगदी जुन्या काळापासून पिढीजात आणि परंपरागत हा सण कोकणी, कोकणा समाजात साजरा केला जातो. या समाजातील लोक मुळातच निसर्ग पूजक असल्याने पंचमीला विशेष महत्त्व आहे. विशिष्ट ठिकाणी घरातील भिंतीवर विविध प्राण्यांच्या चित्रांची पूजा केली जाते. या दिवशी चुलीच्या जवळील भिंतीवर शेणाने सारवून विविध चित्रांचा आराखडा बांबूची बारीक काडी किंवा पिसांची कुंचली (ब्रश) वापरून रेखाटली जातात.
या मध्ये गाय, बैल, शेळी, नाग, वाघ, सिंह, औत, मानवी साखळी, झाडे, घर, चंद्र सूर्य , तारे, पाऊस, साप, विंचू, आणि पाळीव प्राण्यांचे रेखाटन केले जाते. खरं म्हणजे संपूर्ण समाज निसर्ग, प्राणी पूजक असल्याचे हे द्योतकच आहे. चित्रे काढणे एवढंच या दिवसाचं महत्व नसून, यात संपूर्ण चित्ररूपी निसर्ग देवतांचे पूजन देखील या दिवशी केले जाते. चित्र काढताना जुन्या काळात नैसर्गिक पांढरा रंग तयार करून वापरला जाई, परंतु सध्या बाजारात चुना सहज उपलब्ध होत असल्याने चुन्याचा वापर चित्र काढण्यासाठी होत असल्याचे अलीकडे दिसून येते. कोकणी, कोकणा समाजात अशा अनेक निसर्ग पूजनीय प्रथा आढळून येतात. त्यापैकीच ही एक होय.
आदिवासी समाजात / कोकणी, कोकणा समाजात प्रत्येकाच्या घरात या दिवशी गोड-धोड पदार्थ (कान्होळे) बनवले जातात. यानंतर संध्याकाळी घरात चुलीजवळ भिंतीवर शेणाने सारवून त्यावर पांढऱ्या रंगाने किंवा चुन्याने चित्र काढलेल्या ठिकाणी धान्य, पाणी वगैरे ठेऊन भिंतीवर काढलेल्या विविध चित्रांची पूजा करतात, आणि त्यानंतर गोड गोड जेवण तयार करून पंचमीला नैवद्य दाखवितात.
भिंतीवरील हे पंचमीची चित्र म्हणजे चित्रकला शास्त्राचा एक अद्भुत नमुना होय. अर्थात वारली आणि कोकणी, कोकणा आदिवासी समाजातील पेंटिंगचे नमुने यात दिसून येतात. कोकणी, कोकणा समाज देखील चित्रकलेला पिढ्यानपिढ्या जोपासत आलेला आहे. म्हणजेच वारली चित्रकला ही कोकणी, कोकणा समाजात देखील परंपरागत रूढ होती हे या ठिकाणी सिद्ध होते. त्याचप्रमाणे हा समाज देखील चित्रकलेचा उपभोक्ता होता किंवा कलाप्रिय होता असे यावरून दिसून येते. अशाप्रकारे आजही पिढीजात परंपरा पालन करीत आदिवासी कोकणी, कोकणा समाजात पंचमी साजरी केली जाते.
आपल्या आदिवासी समाजात / कोकणी, कोकणा समाजात पंचमी हा महत्वाचा सण असुन, आदिवासी समाजात घरातील भिंतीवर शेणाने सारवुन त्यावर चुन्याच्या साहाय्याने निसर्ग देवतांचे चित्रे रेखाटून त्यांचे पूजन केले जाते.
म्हणून आपली संस्कृती, आपली परंपरा जोपासली जावी व ती एक पिढीकडुन दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित व्हावी या उद्देशाने पंचमी रेखाटन करतात.
आदिवासी समाजात 'पंचमी' सणाच्या दिवशी घराच्या भिंतींवर निसर्ग, जीवसृष्टी आणि जीवनशैलीचे पांढऱ्या किंवा नैसर्गिक रंगांनी रेखाटन करण्याची परंपरा आहे.
➡️रेखाटन करण्याची पद्धत
✓ पंचमी रेखाटन भिंतीची तयारी:
--- पंचमीच्या दिवशी घरातील चूली जवळील भिंत विशिष्ट
चौकोनी आकारात शेण-मातीने किंवा गेरूने सारवून स्वच्छ व गुळगुळीत केल्या जातात.
✓ निसर्ग व जीवसृष्टीचे चित्रणः
--- तांदळाच्या पिठाचे पांढरे पाणी, पांढरा गेरू किंवा चुना वापरून सूर्य, चंद्र, तारे, पाऊस, झाडे, साप, विंचू, वाघ, मोर तसेच विविध प्रकारचे काम करणाऱ्या स्त्रियांचे चित्र रेखाटन, औत आणि पाळीव प्राण्यांचे रेखाटन केले जाते.
✓ लेखणी:
बांबूची बारीक काडी किंवा पिसांची कुंचली (ब्रश) वापरली जाते.
✓ रेखाटन प्रक्रियेचे टप्पे --
सीमा व आधारः
--- प्रथम भिंतीवर वर्तुळ, रेषा किंवा चौकोनी आकार काढून चित्राची चौकट ठरवली जाते.
✓ निसर्ग घटकांचे रेखाटनः
--- सूर्य, चंद्र, झाडे, आणि पशुपक्षी यांची चित्रे काढली जातात.
✓ देवतांचे प्रतीकः
--- आदिवासी संस्कृतीनुसार कुळातील देव किंवा 'सुईणमाता' यांच्या प्रतीकात्मक आकृतीची रेषा रेखाटली जाते.
✓ विधीची समाप्ती व शेवट
पूजा व नैवेद्यः
--- रेखाटन पूर्ण झाल्यावर तिथे हळद-कुंकू, अक्षता व फुले वाहून पूजा केली जाते.
संकलन :-
शंकर मुराबाई सिताराम चौरे
काकरपाडा ता. साक्री, जि. धुळे
7721941496 / 9422736775
No comments:
Post a Comment