माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Tuesday, 8 March 2022

महिला दिन --विशेष सामान्यज्ञान


(१) ' सावरपाडा एक्स्प्रेस ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- कविता राऊत
------------------------
(२) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले 
-------------------------

(३) ' हिमा दास ' कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- धावपटू ( ॶॅथेलेटिक्स )
------------------------------------------------------------
(४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर -- लता मंगेशकर 
------------------------------------------------------------
(५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी 
------------------------------------------------------------
(६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर -- प्रतिभाताई पाटील 
------------------------------------------------------------
(७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- कल्पना चावला
------------------------------------------------------------
(८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी 
------------------------------------------------------------
(९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- बचेंद्री पाल 
------------------------------------------------------------
(१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?
उत्तर -- मीरा कुमार 
------------------------------------------------------------
(११) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?
उत्तर -- किरण बेदी 
------------------------------------------------------------
(१२) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?
उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी 
------------------------------------------------------------
(१३) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- पी. टी. उषा 
------------------------------------------------------------
(१४) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- नेमबाजी 
------------------------------------------------------------
(१५) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?
उत्तर -- सुश्मिता सेन 
------------------------------------------------------------
(१६)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?
उत्तर -- मदर तेरेसा
------------------------------------------------
(१७) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बॅडमिंटन
-------------------------------------------------
(१८) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?
उत्तर -- लाॅन टेनिस
-----------------------------------------------
(१९) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?*
उत्तर -- बाॅक्सिंग ( मुष्टियुद्ध )
-----------------------------------------------
(२०) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- तिरंदाजी
------------------------------------------------
(२१) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- जलतरण
-----------------------------------------------
(२२) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बुध्दिबळ
------------------------------------------------
(२३) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- वेट लिफ्टिंग
------------------------------------------------
(२४) 'कविता राऊत ' कोणत्या क्रीडाप्रकारासाठी. 
प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- धावपटू ( ॶॅथेलेटिक्स )
-----------------------------------------------
(२५) विश्वसुंदरी किताब मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- सुश्मिता सेन
-----------------------------------------------
(२६) ' सरिता गायकवाड ' कोणात्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- धावपटू (ॶॅथेलेटिक्स )
=========================
 संकलक :-  शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा,
केंद्र रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Saturday, 5 March 2022

एव्हरेस्टवीर -- चंद्रकला गावीत


 नाव- कु. चंद्रकला उत्तम गावीत
गाव - मोहपाडा पो. शेंदवड ता. साक्री जि.धुळे

चंद्रकला गावीत धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील

आदिवासी दुर्गम भागातील मोहपाडा (मोहगाव)  गावची

ही तरुणी चंद्रकला उत्तम गावीत एवदशी मुलगी कुणाला खर वाटणार नाही की ही मुलगी एव्हरेस्ट सर करून आली. मात्र तिच्याशी बोलतानाच जाणवते. तिच्यातली आग आणि झुंजायची धमक. एक भाऊ एक बहीण आई- वडिल, काका- काकू, आजी-आजोबा आणि ती असं तिच कुटूंब. झोपडी वजा साधं कौलारू घर. परिस्थिती बेताचीच. थोड्या फार शेतीवर कुटूंबाची गुजराण कशीबशी होते. कारण पाण्याची समस्या मोठी आहे. पाणी नसल्याने पावसाच्या पाण्यावरच शेती होते. पावसाने धोका दिलाच तर मात्र मोलमजुरी शिवाय दुसरा पर्याय नसतो. तिची आई कमलबाई आणि वडिल उत्तम गावीत बाहेरगावी शेतमजुरीसाठी जातात, मात्र मुलींनी खूप शिकावं असे त्या दोघांना खूप वाटतं. वडिलांनी चंद्रकेलाला इंदवे - 
 आश्रम शाळेत शिक्षणासाठी पाठवलं. ती बारावी पास होऊन
सद्या कर्म आ. मा. पाटील महाविद्यालय पिंपळनेर ता. साक्री,
जि. धुळे  एस. वाय. बी. ए. शिक्षण घेते.लहानपणापासूनच ही मुलगी हुशार आहे. ती रनिंगमध्ये तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तर असे तिने राज्यस्तरीय पुरस्कार मिळविले. याच वाटेवर तिनं एक महत्त्वकांशी स्वप्न पाहिलं एव्हरेस्ट मोहिमेवर जाण्याचे स्वप्न. या मोहिमेसाठी आपली निवड व्हावी म्हणून तिनं कसोशीने प्रयत्न केले. यासाठी - क्रीडा शिक्षक - मंगेश
 ठाकरे सर यांनी तिच्या स्वप्नावर विश्वास ठेवला आणि त्यांनी मदत केली व मार्गदर्शन केलं. मिशन शौर्यासाठी निवड तर झालीख मात्र त्यानंतर वर्धा, हैदराबाद, दार्जिलिंग, सिक्किम, लडाख या ठिकाणी खडतर प्रशिक्षण या मुलीला देण्यात आले.
चंद्रकला सांगते, त्या प्रशिक्षणातूनच खूप काही शिकायला मिळाले. आम्हां आदिवासी मुला- मुलींमध्ये उत्साह होताच, मात्र उत्तम आत्मविश्वास निर्माण झाला. आम्हाला वाटले की, हे स्वप्न आपण नक्कीच पूर्ण करू ! आणि आम्ही केलंच !
एव्हरेस्ट सर करण्यासाठी तिला भरपूर अडचणी आल्या परंतु त्या अडचणींवर मात केली. ते शिखर गाठण्यासाठी सात ते आठ टप्यांमध्ये चढायचे होते. शिखर सर करण्यासाठी तिला शर्पा (गाईड) यांच्या मार्गदर्शनाने चढाईला सहा दिवस व उतरायला दोन दिवस लागले. ते शिखर सर्व बर्फाळ भागाने व्यापलेला असल्या कारणाने काही उंची पर्यंत ऑक्सिजन मिळते व पुढे ऑक्सिजन मिळत नसल्याने स्वतः पाठीवर चार ते पाच किलो वजनाचे ऑक्सिजन सिलेंडर घेऊन व बर्फापासून संरक्षणासाठी बर्फाक भागात -लागणारे कपडे व बूट इत्यादी ओझं घेऊन एव्हरेस्ट शिखर आठ दिवसांत तिनं सर केलं.
   सलाम तिच्या कर्तृत्ववला.

शब्दांकन :- श्री. महारू सिताराम चौरे (मा. शिक्षक )
 मो. नं. 9421527722 (पिंपळनेर )
श्री. शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक - पिंपळनेर) 
मो. नं. 9422736775


उतारा वाचन / लेखन.



(१) हा माझा भारत देश 

छान छान माझा देश.
देशात गावे आहेत.
 गावात माणसे आहेत.
गावात नदी आहे.
---------------------------------
(२) थंड हवा सकाळची. 
गार हवा रात्रीची.
गरम हवा दुपारची.
ही तर जादू सूर्याची.
नाही कधीच संपायची !
--------------------------------
(३) घरातील केर दारात नको.
दारातील केर रस्त्यात नको. 
सारा केर उचलू या.
कचराकुंडीत टाकू या.
 गाव स्वच्छ ठेवू या !
------------------------------------
(४) दातांना मंजन लावावे.
स्वच्छ तोंड़ धुवावे.
दररोज अंघोळ करावी. 
वाढलेली नखे काढावीत.
स्वच्छ कपडे घालावेत.
------------------------------------
(५) ही पाहा माझी शाळा.
 शाळेभोवती बाग आहे.
बागेत फुलांची झाडे आहेत. 
आंम्ही झाडांना पाणी घालतो.
आम्ही बागेतील गवत काढतो.
-------------------------------------
(६) मला दोन होत आहेत.
मी हाताने जेवतो. 
मी हाताने नमस्कार करतो.
मी हाताने लिहितो.
मी हाताने काम करतो.
------------------------------------
(७)  गावात घरे आहेत.
गावाबाहेर शेती आहे.
शेतात विहीर आहे.
 विहिरीत पाणी आहे.
पाण्यात मासे आहेत.
--------------------------------------
(८) आम्ही पाणी पिण्यासाठी वापरतो. 
आम्ही पाण्याने अंघोळ करतो. 
आम्ही पाण्याने कपडे धुतो.
 आम्ही पाणी शेतासाठी वापरतो.
 पाणी हे जीवन आहे.
------------------------------------------
(९) पोपट हा पक्षी आहे.
पोपटाचा रंग हिरवा आहे. 
त्याची चोच लाल आहे. 
तो विठू विठू बोलतो. 
पोपटाला पिंजऱ्यात ठेवतात.
==========================
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
           जिल्हा परिषद शाळा जामनेपाडा
          केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
         ९४२२७३६७७५