माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Monday, 5 October 2026

सामान्यज्ञान - १४२‌ जोड्या

(१) इंद्रधनुष्यात  रंग = सात
(२) आकाशाचा रंग = निळा 
(३) पक्ष्यांचा राजा = गरूड 
(४) भारताचा राष्ट्रीय ध्वज =  तिरंगा
(५) भारताचे राष्ट्रीय फूल =  कमळ
(६) भारताचा राष्ट्रीय पक्षी =  मोर
(७)भारताचा राष्ट्रीय प्राणी = वाघ
(८) भारताचा राष्ट्रीय खेळ =  हाॅकी
(९) भारताचे राष्ट्रगीत = जनगणमन
(१०) भारताचे राष्ट्रीय गीत = वंदे मातरम् 
(११) फुलांचा राजा = गुलाब
(१२) फळांचा राजा =  आंबा
(१३) प्राण्यांचा राजा = सिंह
(१४) साखरेची चव = गोड 
(१५)भारताचे राष्ट्रीय फळ = आंबा 
(१६) महाराष्ट्रातील एकूण जिल्हे = ३६
(१७) महाराष्ट्र राज्याची राजधानी‌ = मुंबई
(१८) महाराष्ट्राचे राज्य फूल=  ताम्हण (जारुळ)
(१९) महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष = आंबा
(२०) महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी = शेकरू
(२१) महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी = हरियाल
(२२) महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर = कळसुबाई
(२४) हत्तीच्या नाक म्हणजे = सोंड
(२५) आकाराने सर्वात मोठा पक्षी = शहामृग
(२६) पिसारा फुलवून नाचणारा पक्षी = मोर 
(२७) लांब मानेचा प्राणी = जिराफ 
(३१) सर्वांत मोठ्या कानांचा प्राणी = हत्ती 
(३२) वाळवंटात राहणारा प्राणी‌ = उंट 
(३३)झाडावर तुरूतुरू चढणारा प्राणी =खार 
(३४) लांब पिसे असलेला पक्षी = मोर 
(३५) ऊसापासून तयार होते = गूळ 
(३६) ऊसापासून तयार होते = साखर 
(३७) हरभ-याचा पीठ =  बेसन 
(३८) पोपटाचा रंग =  हिरवा 
(३९) मधमाशांचे घर = पोळे 
(४०) कोंबडीचे घर / निवारा = खुराडे 
(४१) चिमणीचे घर‌ = घरटे 
(४२) सिंहाचा निवारा= गुहा 
(४३) माणसाचा निवारा = घर 
(४४) वाघाचा निवारा = गुहा 
(४५) गाई - गुरांचा निवारा = गोठा 
(४६) पक्ष्यांचा समूह = थवा 
(४७) फुलांचा समूह = गुच्छ 
(४८) फुलझाडांचा समूह = ताटवा 
(४९) बांबूचा समूह‌ = बेट 
(५०) बैलांचे ओरडणे =  हंबरणे 
(५१) म्हशीचे ओरडणे  =  रेकणे 
(५२) म्हशीचे पिल्लू =  रेडकू
(५३) घोड्याचे पिल्लू = शिंगरु 
(५४) वाघिणीचे पिल्लू = बच्चा , बछडा 
(५५) गाईचे पिल्लू = वासरू 
(५६) हरणाचे पिल्लू = पाडस,  शावक 
(५७) शेळीचे पिल्लू =  करडू 
(५८) कुत्र्याचे पिल्लू = पिल्लू 
(५९) सिंहाचे पिल्लू = छावा 
(६०) मेंढीचे पिल्लू = कोकरू 
(६१) गाढवाचा पिल्लू = शिंगरु 
(६२) तेलबियांचा राजा = शेंगदाणा
(६३) कोळी या किड्याला पाय= आठ
(६४) ' खजूर ''  या फळात बिया = एक
(६५) फांद्या नसलेली वनस्पती = नारळ
(६६) घरटी न बांधणारा पक्षी = कोंबडी
(६७) घरात जळमटे करणारा प्राणी = कोळी
(६८) सोंड असलेला प्राणी =  हत्ती
(६९) घराची राखण करणारा प्राणी = कुत्रा
(७०) शेतीच्या कामात मदत करणारा प्राणी = बैल
(७१) पाय नसणारा प्राणी =  साप
(७२) सहा पाय असणारा प्राणी = झुरळ
(७३) सजीवांचे दोन गट = प्राणी व वनस्पती 
(७४)‌ बैलाची मादी =  गाय
(७५) कोकिळेने केलेला आवाज = कुहूकुहू
(७६) आवळ्याची चव =  तुरट
(७७)  लिंबाची चव = आंबाट
(७८) जगातील सर्वांत उंच प्राणी = जिराफ
(७९) मिठाची चव = खारट
(८०) गुळाची चव = गोड
(८१) चिंचेची चव = आंबट
(८२) कारल्याची चव = कडू
(८३) कावळ्याचा रंग = काळा
(८४) आपला देश = भारत
(८५) जगातील सर्वांत मोठा पक्षी = शहामृग
(८६) एक दिवसाचे तास = २४ तास
(८७) एक वर्षाचे महिने = १२ (बारा )
(८८) महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी =  गोदावरी
(८९) वेगाने धावणारा पक्षी = शहामृग
(९०) सूर्य उगवतो ती दिशा = पूर्व
(९१) सूर्य मावळतो ती दिशा = पश्चिम
(९२) ज्ञानेंद्रिये एकूण = पाच
(९३) मुख्य दिशा =  चार
(९४) उपदिशा = चार
(९५) आठवड्याचे वार = सात
(९६) आकाशाचा रंग =  निळा
(९७) कल्पवृक्ष  = नारळ ( माड )
(९८) महाराष्ट्राची राजभाषा =  मराठी
(९९) कच्च्या कैरीचा रंग = हिरवा
(१००) पृथ्वीचा आकार =  गोल
(१०१) सूर्यापासून मिळते = प्रकाश / उष्णता 
(१०२) सजीव सृष्टी असलेल ग्रह = पृथ्वी
(१०३) पूर्व दिशेच्या समोरची दिशा = पश्चिम
(१०४) दक्षिण दिशेच्या समोरची दिशा =  उत्तर
(१०५)सूर्योदयापासून सूर्यास्तापर्य॓तच्या काळ = दिन
(१०६) सूर्योस्तापासून सूर्यादयापर्यंतच्या काळ =  रात्र
(१०७) दिन व रात्र मिळून एक = पूर्ण दिवस
(१०८) आंब्याची बी = कोय
(१०९) फणसाची बी = आठळी
(११०) कापसाची बी  = सरकी
(१११) चिंचेची बी = चिंचोका
(११२) पारंब्या असणारे झाड =  वड
(११३)समुद्राच्या पाण्याची चव = खारट
(११४) मुख्य ऋतू = तीन 
(११५) ' मुंगी ' या किटकाला पाय =  सहा 
(११६)  एका वर्षात एकूण दिवस‌ = ३६५
(११७) मानवी रक्ताची चव = खारट
(११८) चवीचे प्रकार = चार 
(११९)भुईमुगाची बी = शेंगदाणा
(१२०) सूर्य उगवतो = सकाळी
(१२१) सूर्य उगवण्या‌ अगोदरची वेळ = पहाट
(१२२)सूर्य आकाशात मध्यावर आल्याची वेळ = दुपार
(१२३) सूर्य मावळण्याची वेळ = संध्याकाळ
(१२४) उन्हाळ्यातील हवा = गरम
(१२५) हिवाळ्यातील हवा = थंड
(१२६) पावसाळ्यातील हवा = दमट
(१२७) चवीचे प्रकार = गोड, कडू, आंबट, खारट.
(१२८) ज्ञानेंद्रिये = ज्ञान देणारे अवयव.
(१२९) डोळ्यांचा उपयोग = पाहण्यासाठी.
(१३०) कानाचा उपयोग = ऐकण्यासाठी
(१३१)नाकाचा उपयोग = वास घेणे / श्वास घेणे.
(१३२) शरीरावरील कातडी = त्वचा
(१३३) त्वचेमुळे मिळणारे ज्ञान = स्पर्शज्ञान
(१३४) दातांचा उपयोग = अन्न चावून खाण्यासाठी.
(१३५) बैल पुजेचा सण= पोळा 
(१३६)पावसाळ्याचे महिने = ४ ( चार)
(१३७) उन्हाळ्याचे महिने = ४ ( चार)
(१३८) हिवाळ्याचे महिने = ४ ( चार)
(१३९) एक मिनिटाचे सेकंद = ६०
(१४०) एक तासाचे मिनिटे = ६०
(१४१) एक महिन्याचे दिवस = ३० / ३१
(१४२) पिकलेल्या केळ्यांचा रंग = पिवळा
==========================
लेखन / संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा गरताड गावठाण, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५  / ७७२१९४१४९६

No comments:

Post a Comment