माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 28 March 2019

ताणतणाव कमी करण्यासाचे मार्ग

● ताणतणाव कमी करण्यासाठी पुढील मार्ग आहेत.

(१) सुसंवाद :-
---  मित्र - मैत्रिणी, समवयस्क, भाऊ - बहिणी,
शिक्षक व पालक या सर्वांशी सुसंवाद साधणे
म्हणजेच आपले मन मोकळे करणे, याने
ताणतणाव कमी होतो.

(२) लेखन :-
---     मनातले विचार लिहून काढले आणि
आपल्या चुकीच्या विचारांचे विश्लेषण केले
तरीही ताण कमी होतो.

(३) छंद जोपासणे :-
---     वस्तूंचा संग्रह करणे, छायाचित्रण,
दर्जेदार पुस्तकांचे वाचन, पाककला,
शिल्पकला, चित्रकला,  रांगोळी, नृत्य आणि
छंद मनाला लावून घेतले तर ताण येत नाही
आणि रिकामा वेळदेखील सत्कारणी लागतो.
सकारात्मक गोष्टींकडे ऊर्जा व मन वळवावे.
त्यामुळे नकारात्मक भावना कमी होतात.

(४) हास्यमंडळ :-
--- एकत्र जमून मोठ्यामोठ्याने व मनमोकळे
हसून आपला ताण हलका करता येतो.

(५) संगीत  :-
- संगीत शिकणे, ऐकणे, गाणी म्हणणे यांमुळे
आनंद मिळून ताण हलका होतो. संगीतात
मनः स्थिती बदलण्याची ताकद असते.

(६) मैदानी खेळ व व्यायाम  :-
-- मानसिक आणि शारीरिक आरोग्य मैदानी
खेळांमुळेसुधारते. खेळांमुळे शारीरिक व्यायाम,
शिस्त, इतरांशी आंतरक्रिया,संघभावना वाढणे,
एकाकीपणा संपून व्यक्ती समाजाभिमुख होणे
असे अनेक फायदे असतात. योगाचा पण सराव असावा.

(७) निसर्ग भ्रमण, पक्षी निरीक्षण, पाळीव
      संगोपन यानेही ताण कमी होतो.

================================

संकलन :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             9422736775


   
 

Tuesday, 26 March 2019

सांगा पाहू.  ( वैज्ञानिक प्रश्नावली )

(१) आदिवासींकडे कोणता अनमोल ठेवा आहे  ?

---  वनस्पती व प्राणी यांबाबतच्या पारंपरिक
     ज्ञानाचा खजिना आदिवासींजवळ आहे.
     हा खजिना जतन करणे अत्यावश्यक आहे.
    अन्यथा काळाच्या ओघात हा खजिना व
    त्याचबरोबर जैविक विविधता नष्ट होईल.

    
(२) खांद्यावर  लटकलेल्या शाळेच्या बॅगांना रूंद पट्टे का असतात  ?

--  रूंद पट्टयांमुळे बॅगेचे वजन विस्तृत क्षेत्रफळात
   विभागले जाते. त्यामुळे खांद्यावर पडणारा दाब कमी होतो.

(३) आरसा तयार करताना काचेचा पृष्ठभाग चकचकीत का करतात  ?

-- चकचकीत पृष्ठभागावरून प्रकाशाचे पूर्ण
   परावर्तन होते आणि प्रतिमा स्पष्ट दिसते.

(४)हिमालयात सतत बर्फ का असतो  ?

--- हिमालयात नेहमीच तापमान अतिशय कमी
   असल्यामुळे हवेतील पाण्याची वाफ तसेच
   पाणी गोठते. त्याचा परिणाम म्हणून बर्फ
   तयार होतो.

Monday, 25 March 2019

सामान्य विज्ञान प्रश्नावली

सामान्य विज्ञान प्रश्नावली

(१)आगपेटीच्या काडीच्या गुलावरील पदार्थ कोणता  ?

---  तांबडा फॉस्फरस.

(२)पितळ तयार करण्यासाठी वापरात येणारे धातू कोणते  ?

---  तांबे व जस्त.

(३)आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते  ?

---  डेसीबल

(4)विद्युतदाब मोजण्याचे एकक कोणते ?

---  व्होल्ट.

(५)लहान वस्तू मोठ्या आकारात दाखविणारे उपकरण कोणते  ?

---  सूक्ष्मदर्शक.

(६)उष्णता मोजण्याचे उपकरण कोणते  ?

---  कॅलीमीटर

(७)कमी ऐकू येत असल्यास वापरले जाणारे उपकरण कोणते  ?

---  श्रवणयंत्र.

(८) विद्युतप्रवाह मोजण्याचे परिमाण कोणते ?

---  अॅम्पिअर.

(९) उष्णतेचे प्रमाण मोजण्याचे उपकरण कोणते ?

---  तापमापक.

(१०)हृदयातील आणि फुप्फुसातील चलनवलनांची माहिती देणारे उपकरण कोणते ?

---  स्टेथोस्कोप

=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             9422736775