(१) आदिवासींकडे कोणता अनमोल ठेवा आहे ?
--- वनस्पती व प्राणी यांबाबतच्या पारंपरिक
ज्ञानाचा खजिना आदिवासींजवळ आहे.
हा खजिना जतन करणे अत्यावश्यक आहे.
अन्यथा काळाच्या ओघात हा खजिना व
त्याचबरोबर जैविक विविधता नष्ट होईल.
(२) खांद्यावर लटकलेल्या शाळेच्या बॅगांना रूंद पट्टे का असतात ?
-- रूंद पट्टयांमुळे बॅगेचे वजन विस्तृत क्षेत्रफळात
विभागले जाते. त्यामुळे खांद्यावर पडणारा दाब कमी होतो.
(३) आरसा तयार करताना काचेचा पृष्ठभाग चकचकीत का करतात ?
-- चकचकीत पृष्ठभागावरून प्रकाशाचे पूर्ण
परावर्तन होते आणि प्रतिमा स्पष्ट दिसते.
(४)हिमालयात सतत बर्फ का असतो ?
--- हिमालयात नेहमीच तापमान अतिशय कमी
असल्यामुळे हवेतील पाण्याची वाफ तसेच
पाणी गोठते. त्याचा परिणाम म्हणून बर्फ
तयार होतो.
No comments:
Post a Comment