माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 28 January 2021

भारत -- ऊर्जानिर्मिती ( प्रश्नावली )


(१) ' उकाई ' जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- गुजरात

(२) ' दुर्गापूर ' औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- पश्चिम बंगाल

(३) ' रंगनदी ' जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- अरूणाचल प्रदेश

(४) ' कोसी ' जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- बिहार

(५) ' कोयना ' जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- महाराष्ट्र

(६) ' एकलहरे ' औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- महाराष्ट्र

(७) ' काक्रापारा ' अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- गुजरात

(८) ' नागार्जूनसागर ' जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- आंध्र प्रदेश

(९) ' बारपानी ' जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- आसाम

(१०) ' रेणुसागर ' औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- उत्तर प्रदेश

(११) ' भगवानपूर ( निमूच) सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- मध्यप्रदेश

(१२) ' हिराकूड ' जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- ओरिसा
==================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

Tuesday, 26 January 2021

मराठी भाषा सौंदर्य


घागर घेतली
घागर आणली
घागर उचलली
घागर ठेवली
घागर बुडाली
घागर भरली
घागर पडली
घागर फुटली

झाड लावणे
झाड वाढणे
झाड ठेंगणे
झाड पसरणे
झाड मोहरणे
झाड सुकणे
झाड वाळणे
झाड पाडणे

जमीन तापणे
जमीन भंगणे
जमीन खणणे
जमीन खोदणे
जमीन वखरणे
जमीन वाफाळणे
जमीन भेगाळणे
जमीन तडकणे
जमीन पाझरणे
============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Thursday, 21 January 2021

काही संख्यांच्या वाचनाची रीत / पध्दत.


व्यवहारात काही संख्यांचे वाचन वेगवेगळ्या पद्धतीने करतात. उदा. २५० ही संख्या दोनशे पन्नास अशी न
वाचता ती अडीचशे अशी वाचतात.
१२५ = सव्वाशे
२२५ = सव्वा दोनशे
३२५ = सव्वा तीनशे
४२५ = सव्वा चारशे
५२५ = सव्वा पाचशे
६२५ = सव्वा सहाशे
७२५ = सव्वा सातशे
८२५ = सव्वा आठशे
९२५ = सव्वा नऊशे
---------------------------------
१५० = दीडशे
२५० = अडीचशे
३५० = साडे तीनशे
४५० = साडे चारशे
५५० = साडे पाचशे
६५० = साडे सहाशे
७५० = साडे सातशे
८५० = साडे आठशे
९५० = साडे नऊशे
------------------------------------------------------
१७५ = पावणे दोनशे
२७५ = पावणे तीनशे
३७५ = पावणे चारशे
४७५ = पावणे पाचशे
५७५ = पावणे सहाशे
६७५ = पावणे सातशे
७७५ = पावणे आठशे
८७५ = पावणे नऊशे
===============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५