माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Monday, 31 July 2017

निबंध वाचा व प्रश्नांची उत्तरे सांगा.

   निबंध वाचा व प्रश्नांची उत्तरे सांगा.

       माझा आवडता पक्षी -कावळा

  कावळा हा सर्वांच्या परिचयाचा पक्षी आहे.
त्याचा रंग काळाकुट्ट असतो. मानेजवळचा
भाग मात्र करडा असतो. त्याची चोच खूप
मोठी असते. त्याचा आवाज कर्कश असतो.
तो काव -काव असे ओरडतो. तो एखाद्या
वस्तूकडे बघताना मान वाकडी करून बघतो.
तो खूप चलाख असतो. बघता बघता तो
एखादी वस्तू चोचीत उचलून नेतो.
  तो उंच झाडावर आपले घरटे बांधतो. तो
अळ्या, किडे आणि जे इतर काय मिळेल
ते खातो. तो घाणेरड्या वस्तूसुद्धा खातो.
म्हणून त्याला साफसफाई करणारा पक्षी
म्हणतात. एखादा कावळा मरून पडल्यास
तेथे काव -काव करत अनेक कावळे एकत्र
जमतात.
  लहान मुलांना हा पक्षी आवडतो. त्यांना
झोपताना कावळ्याच्या गोष्टी ऐकायला आवडते.
========================

प्रश्न :-  खालील प्रश्नांचीउत्तरे सांगा.

  १.कावळ्याचा रंग कसा असतो  ?

  २.कावळ्याच्या मानेजवळचा भाग
      कसा असतो ?

  ३.कावळ्याची चोच कशी असते ?

  ४.कावळ्याचा आवाज कसा असतो ?

  ५. कावळा घरटे कुठे बांधतो  ?

  ६. कावळा काय -काय खातो  ?

  ७. खूप कावळे एकत्र केव्हा येतात ?

लेखन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
            जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
            ता.साक्री जि.धुळे
            📞 ९४२२७३६७७५

Saturday, 29 July 2017

उच्चारातील फरक ओळखू या

     उच्चारातील फरक ओळखू या

लेखन आणि वाचन यात आढळून येणा-या भाषिक चुका ज्या त्या वेळीच दुरूस्त करून घ्याव्यात.खाली काही उपयुक्त माहिती आपण पाहू .

● ' न ' आणि 'ण' /  'श' आणि 'ष'

यांच्या उच्चारात मूलभूत सूक्ष्म फरक आहे.
     यांतील काही अक्षरांचा दाताच्या मुळाशी जिभेचा स्पर्श होऊन केला जातो,तर काहींच्या उच्चाराच्यावेळी टाळुच्या मधल्या भागास जिभेचा स्पर्श होतो.
हा उच्चारभेद आपण पुढील शब्द वाचून -बोलून समजावून घेऊया .

१)' न ' आणि  'ण' बाबत ~
● ' न ' चा उच्चार करताना जिभेचा स्पर्श दाताच्या मुळाशी होतो.
       नळ , नभ , नख , नस , नग, नट ,नरम ,नवस ,
नजर , नाक , नाग , नाटक , नाना , नापास .

● ' ण ' चा उच्चार करताना जीभ मागे वळून टाळूच्या मागील भागास स्पर्श करते.
        खण , पण , सण , बाण , आण , धरण, वरण , हरण , पाणी , मटण माणूस , शेण .
-------------------------------------------

२) ' श '   आणि   'ष ' बाबत ~
     ' श ' चा उच्चार करताना टाळुच्या मधल्या भागास जिभेचा स्पर्श होतो.
        शरद  , शहर , शरम , शरण , शहाणा , शाळा.

' ष ' चा उच्चार करताना टाळुच्या मागच्या भागास जीभेचा स्पर्श  होतो.
        षटकार , षटकोन , पुरुष , औषध , ऋषी , घोष , कोष , वेष .
      
संकलन :- शंकर चौरे (प्रा.शिक्षक)
            जि.प.प्रा.शाळा बांडीकुहेर
            ता. साक्री जि.धुळे   
           📞९४२२७३६७७५.

Friday, 28 July 2017

MY FAVOURITE

           MY  FAVOURITE

(1) My favourite colours.
---- Red , blue.

(2) My favourite games.
--- Kho -Kho  ,  cricket.

(3)My favourite fruits.
---- Mango ,  banana.

(4)My favourite vegetables.
---- Brinjal,  cabbage

(5)My favourite domestic animals
---- Cow,   dog.

(6)My favourite wild animals.
---- Tiger,  deer.

(7)My favourite birds.
----  Peacock ,  crow.

(8)My favourite flowers.
---- Rose,  marigold.

(9)My favourite trees.
---- Coconut ,  Mango tree.

(10)My favourite grains.
----  Rice ,  ragi.

(11)My favourite dry  fruits.
---- Cashew nut,  date.

(12)My favourite  foods.
---- Rice,  milk.

(13)My favourite vehicles
---- Bus ,  bicycle.

(14)My favourite  subjects.
---- Marathi,   art.

(15)My favourite art.
---  Drawing  , craft.

(16)My favourite jewels.
---- Ring  , chain.

(17)My favourite aquatic animals.
---- Fish ,  Crab.

(18)My favourite reptile animals.
---- Snail , Tortoise

(19)My favourite seasons.
--- Rainy(monsoon), winter.

(20)My favourite cities. 
---- Nasik,  kolhapur

(21)My favourite forts.
---- Raigad,  Pratapgad

Shankar Chaure
       Z.P.School Bandikuher
       Tal.sakri  Dist. Dhule
       9422736775.

उपक्रम

                  उपक्रम
  शब्दात लपलेला दुसरा शब्द सांगा.
          
   (१) घरात  - रात.
   (२) कपाट  - पाट.
   (३) प्रवास   - वास.
   (४) प्रताप   -  ताप.
   (५) प्रभाव   -  भाव.
   (६)  प्रभात   -  भात.
   (७) प्रचार   -  चार.
   (८) प्रहार   -  हार.
   (९) प्रघात  - घात.
   (१०) रामन   -  मन.
   (११) निवड  -  वड.
   (१२) श्रीखंड  -  खंड.
  (१३) श्रीपाल  - पाल.
  (१४) सातारा  - तारा.
   (१५) कोपर  -  पर.
  (१६) केसाळ  - साळ.
   (१७) तरस   -  रस.
   (१८) चिमणी  -  मणी.
   (१९) कमळ   -  मळ.
   (२०) चिवडा   -  वडा.
   (२१) गवार   -  वार.
   (२२) काकडी  - कडी.
   (२३) तुरुंग   -  रंग.
   (२४) मसूर   - सूर.
   (२५) चवळी   -  चव
   (२६) लोहार  - हार.
  ------- shankar chaure -----
   (२७) नावाडी  -  वाडी. 
   (२८) सुतार   -  तार.
   (२९) गुराखी  - राखी.
   (३०) विमान  -  मान.
   (३१) फवारा  - वारा.
   (३२) दगड   -  गड.
   (३३) दुकान  - कान .
   (३४) पारवा  -  रवा.
   (३५) हिरवा  -  रवा.
   (३६) पाऊस  - ऊस
   (३७) पगार   -  गार.
   (३८) भूगोल  - गोल.
   (३९) निकाल  - काल.
   (४०) बाहेर  -  हेर 
   (४१) प्रगती  -  गती.
   (४२) सुमन  - मन.
   (४३) पाकळी  - कळी.
   (४४) तपास  -  पास.
   (४५) मशाल   - शाल.
    --  --   --  --  --  --  --  --
   (४६) पालक   -  पाल.
   (४७) ससाणा  - ससा.
   (४८) तासणी   -  तास.
   (४९) कानस   -  कान.
   (५०) वासरू   - वास.
   (५१) केसरी  - केस.

   लेखन :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
               जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
               ता.साक्री  जि.धुळे
                ¤ ९४२२७३६७७५ ¤

Wednesday, 26 July 2017

नाग (नागाची माहिती)

         नाग (नागाची माहिती)

   नागाला दोन डोळे असतात. नागाला
श्वास घेण्यासाठी दोन नाकपुड्या असतात.
नागाच्या शरीरात अनेक मणके असतात.
ह्या मनक्यांमुळे नाग झाडावर चढू शकतो
आणि जमिनीवर सरपटू शकतो. नागाला फणा
असतो. बर्‍याच नागांच्या फण्यावर दहा चा
आकडा असतो. नाग चिडला असता जोरात
फुत्कारतो. नागाला जमिनीखाली बिळात
राहणे फार आवडते. नागाच्या मातीच्या घरास
वारुळ असे म्हणतात. नागाच्या अंगावर
वेगवेगळ्या रंगाची नक्षी असते. नागाच्या
कातडीस कात असे म्हणतात. नाग ही कात
काही कालांतराने काढून टाकत असतो.
नागाच्या तोंडामध्ये दोन विषारी दात असतात.
ह्या त्यांच्या वरती विषग्रंथी असतात.
नागाच्या ह्या विषाचा उपयोग बर्‍याचश्या
औषधांमध्ये केला जातो. नागाला शेतकऱ्यांचा
मित्र असे म्हणतात. कारण नाग हा शेतात
धान्याची नासाडी करणाऱ्या उंदरांना खातो.

●आहार - नाग हा उंदीर, बेडूक आणि इतर
                 लहान कीटकांना खाते.

●जाती--किंग कोब्रा,

●आकार --नागाची लांबी ३फुटापासून ते१०
                 फुटापर्यंत असते.

●वय -- नागाचे आयुष्यमान १०ते १५वर्षापर्यंत
              असते.

●रंग -नागाचा रंग हिरवा, काळा,लाल, पट्टेरी
            असे असतात.
               
  संकलन :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
              जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
              ता.साक्री जि. धुळे  

Tuesday, 25 July 2017

ओळखा पाहू मी कोण ?

     ओळखा पाहू मी कोण ?

(१) झाडांना मी आधार देतो.
     क्षार व पाणी शोषून घेतो.
     त्यांना खोडाकडे मी पाठवतो.
     ओळखा पाहू मी कोण  ?

(२) वनस्पतींना देतो आकार
     पानाफुलांना देतो आधार
     सर्वांना पोहचवितो पाणी व क्षार
    ओळखा पाहू मी कोण  ?

(३) रंग माझा हिरवा हिरवा
     माझ्यात आहेत हिरवे कण
    करतो तयार वनस्पतींचे अन्न
    ओळखा पाहू मी कोण  ?

(४) त-हेत-हेचे  रंग मजेचे
     वेगवेगळ्या आकाराचे आणि सुगंधाचे
     म्हणून देवालाही आवडतो आम्ही
     फळांना जन्म देतो आम्ही
     ओळखा पाहू आम्ही कोण ?

उत्तरे :-(१)मूळ,(२)खोड,(३)पान,(४)फूल 

संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
               जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                ता.साक्री जिल्हा धुळे
                    📞 ९४२२७३६७७५

Monday, 24 July 2017

पक्ष्यांची थोडक्यात माहिती


     पक्ष्यांची थोडक्यात माहिती
   
(१) मोर -
मोर हा फारच सुंदर पक्षी आहे. त्याचा रंग
चमकदार हिरवा -निळा असतो. त्याच्या
डोक्यावर सुंदर तुरा असतो. पण त्याचे
पाय कुरूप व उंच असतात. मोराचा
पिसारा वजनदार व लांबलचक असतो.
मोर पावसात पिसारा फुलवतो आणि
नाचतो. तेव्हा तो फारच सुंदर दिसतो.
मोर रानात राहतो. तो धान्य व कीटक
खातो. तो फार उंच उडू शकत नाही.
मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे.

(२) पोपट -
पोपट हा एक सुंदर पक्षी आहे. त्याचा रंग
हिरवागार असतो. त्याची चोच लालभडक,
बाकदार व धारदार असते. त्याच्या गळ्या-
भोवती काळी रेघ असते.त्याला कंठ
म्हणतात. पोपट झाडाच्या ढोलीत राहतो.
-----------shankar chaure ------

(३) कावळा -
कावळा हा सर्वांच्या परिचयाचा पक्षी आहे.
त्याचा रंग काळाकुट्ट असतो. मानेजवळचा
भाग मात्र करडा असतो. त्याची चोच
खूप मोठी असते. त्याचा आवाज कर्कश
असतो. तो कावकाव ओरडतो. तो खूपच
चलाख असतो. कावळा उंचावर घरटे
बांधतो. तो अळ्या,किडे आणि जे इतर
काही मिळेल ते खातो. लहान मुलांना
हा पक्षी फारच आवडतो.

(४) कोंबडा -
कोंबडा हा पाळीव पक्षी आहे. तो फार
उंच उडू शकत नाही. मुख्यतः तो चालतोच
त्याचे चालणे ऐटबाज असते. कोंबडे
पांढर्‍या, काळ्या किंवा तपकिरी व मिश्र
रंगाचे असतात.कोंबड्याची चोच टोकदार
असते. पाय उंच असतात. त्याच्या डोक्यावर
लालभडक तुरा असतो. तो दिवसभर
इकडेतिकडे फिरत असतो. मातीतील
धान्याचे कण व किडे हे त्याचे अन्न असते.
कोंबड्याच्या ओरडण्याला आरवणे
म्हणतात.

(५) चिमणी -
चिमणी हा पक्षी सर्वत्र आढळतो. चिमणी
हा अगदी छोटासा पक्षी आहे. चिमणीचा
रंग करडा असतो. इवल्याशा चोचीने ती
पटपट दाणे टिपते. तिचे पंख इवलेसे व
पायही इवलेसे असतात. ती एक-एक पाय
टाकत कधी चालत नाही. ती टुणटुण उड्या
मारत चालते. चिमणी चिवचिव आवाज
काढून इकडेतिकडे भुर्रकन उडत फिरते.
लहान मुलांना चिमणी फार आवडते.
       
      लेखन :-  शंकर सिताराम चौरे
                   जि.प.शाळा बांडीकुहेर
                   ता.साक्री जि.धुळे
                   📞 ९४२२७३६७७५
   http://shankarchaure.blogspot.in

              

Thursday, 20 July 2017

Word game

                Word game

    SHANKAR CHAURE (Dhule)
     ¤ 9422736775 ¤

■ Repeat the word and write
   the last letters.
(शब्द पुनःपुन्हा म्हणा व शेवटचे अक्षर लिहा.)

● खालील शब्दांचे शेवटचे अक्षर लिहा.

(1) bat ,  cat ,  fat.       -- t

(2) cap,   tap,   map.   -- p

(3) cot,   hot,   not.     --  t

(4) can,   fan,   man.  --  n

(5) net,   pet,   let      --    t

(6) mug   jug   bug    --  g

(7) boy   toy   Joy     --   y

(8) six    mix   fix .    --    x

(9) pen    hen  ten.  --    n

(10) hut   but   cut.  --   t

      Shankar  Chaure
      z.p.school bandikuher
      tal. sakri  dist  dhule
      📞 9422736775 

प्रत्येक रंगाच्या प्रत्येकी पाच पाच गोष्टींची नावे सांगा.

                     उपक्रम          
      प्रत्येक रंगाच्या प्रत्येकी पाच पाच
             गोष्टींची नावे सांगा.  
          ┄─┅━━▣▣▣━━┅─•
(१) पांढरा :-
-- पांढरी भिंत, पांढरा रुमाल, पांढरा कागद
    पांढरी गाय,  पांढरे मीठ.

(२) निळा :-
-- निळे आकाश, निळा समुद्र, निळी शाई,
   निळे जाकीट, निळे पाकीट.

(३) हिरवा* :-
-- हिरवे झाड, हिरवे पान, हिरवी शालू ,
   हिरवी मिरची,  हिरवा पोपट.

(४) लाल :-
-- लाल टोपी,  लाल साडी,  लाल टोमॅटो,
   लाल पिशवी,  लाल चप्पल.

(५) काळा :-
-- काळी शाई,  काळा ढग, काळा अंधार,
   काळा इजार , काळी बॅग.

(६) जांभळा :-
-- जांभळी वेल, जांभळा कपडा, जांभळा शर्ट,     जांभळा जांभूळ,जांभळी साडी

(७) तांबूस /तांबडा :-
-- तांबडा टमाटा, तांबडा रुमाल, तांबडे टेबल,
   तांबूस ढग,  तांबडी माती.

  संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                 जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                 ता.साक्री जि.धुळे
                 📞 ९४२२७३६७७५
 

Wednesday, 19 July 2017

उपक्रम:- नाते संबंध सांगा

                          उपक्रम
                    नाते संबंध सांगा

लेखन :- शंकर चौरे(पिंपळनेर) धुळे
            ¤ ९४२२७३६७७५ ¤

(१)बाबांचे बाबा तुमचे कोण ?
-- आजोबा .

(२)बाबांची आई तुमची कोण ?
-- आजी.

(३)बाबांची बायको तुमची कोण ? 
--  आई.

(४)बाबांचा मुलगा तुमचा कोण ?
-- भाऊ .

(५)बाबांची मुलगी तुमची कोण? 
--  बहिण.

(६)बाबांचा भाऊ तुमचा कोण?
-- काका.

(७)काकांची बायको तुमची कोण? 
--  काकी.

(८)काकाचा मुलगा तुमचा कोण?
--  चुलतभाऊ

(९)काकांची मुलगी तुमची कोण?
--   चुलतबहिण.

(१०)काकांची बहिण तुमची कोण?
--  आत्या.

(११)बाबांची बहिण तुमची कोण ?
-- आत्या.

(१२)आत्याचा मुलगा तुमचा कोण?
-- आतेभाऊ.

(१३)आत्याची मुलगी तुमची कोण?
--  आतेबहिण.

(१४)आईचे बाबा तुमचे कोण ?
-- आजोबा.

(१५)आईची आई तुमची कोण ?
--  आजी.

(१६)आईचा मुलगा तुमचा कोण ?
-- भाऊ.

(१७)आईची मुलगी तुमची कोण ?
-- बहीण.

(१८)आईची बहिण तुमची कोण ?
-- मावशी.

(१९)आईच्या बहिणीची मुलगी तुमची कोण ?
-- मावसबहीण

(२०)मामाची बहीण तुमची कोण ?
-- मावशी.

(२१)मावशीचा भाऊ तुमचा कोण?
-- मामा.

(२२)भावाचा मुलगा तुमचा कोण?
-- पुतण्या.

(२३)बहिणींचा मुलगा तुमचा कोण?
-- भाचा.

(२४)मावशीची आई तुमची कोण?
-- आजी.

(२५)मावशीचे बाबा तुमचे कोण?
-- आजोबा.

(२६)आईचे पती तुमचे कोण ?
-- बाबा (वडील).

                    लेखन :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
                         जि.प.शाळा बांडीकुहेर
                         ता.साक्री जि.धुळे.
                            ९४२२७३६७७५

Monday, 17 July 2017

उपक्रम 

                       उपक्रम 
        चिठ्ठी उचलू -- पाच नावे सांगू .
       
साहित्य :- प्रश्नचिठ्ठया
कृती :-
 १. पाच विद्यार्थ्यांचा गट करावा. गटनायक
     नेमावा.
२.गटामध्ये 'प्रश्नचिठ्ठया ठेवाव्यात.
३.प्रत्येकाला एक चिठ्ठी उचलण्यास सांगावी.
  विद्यार्थ्यांनी आपापल्या चिठ्ठ्या वाचाव्यात.
४.एका विद्यार्थ्यांने त्याच्याजवळील चिठ्ठीवरील
   मजकूर वाचून उत्तर सांगावे.

जसे -- गोल आकाराच्या वस्तू सांगा ?
उत्तर -- चेंडू, गोळा, लिंबू,  लाडू , गोटी.
५.प्रश्न चिठ्ठ्या बदलून सराव द्यावा.

चिठ्ठ्यांसाठी विषय --

१. फळांची नावे
उत्तर -- आंबा, पपई, पेरु, फणस, संत्री.

२.शेपूट असणारे प्राणी
उत्तर -- माकड, गाय, बैल, घोडा, वाघ.

३.पाण्यातील प्राणी
उत्तर -- मासा, मगर, कासव, खेकडा, बेडूक.

४.खेळांची नावे
उत्तर - कबड्डी, क्रिकेट, लंगडी, हाॅकी, खोखो.

५.काटेरी वनस्पती
उत्तर - गुलाब, बोर, करवंद, लिंबू, बाभूळ.

६.शिंगे असणारे प्राणी
उत्तर -- बैल, म्हैस, गाय, शेळी, सांबर.

७. वाहनांची नावे
उत्तर - सायकल, रिक्षा, टॅक्सी ,ट्रक, विमान.

८.जंगली प्राणी
उत्तर - हत्ती, सिंह, वाघ, कोल्हा, हरिण.

९.झाडांची नावे
उत्तर - साग, शिसव, खैर, अशोक, पळस.

१० एक बी असलेली फळे
उत्तर - खजूर, आवळा, जांभूळ,आंबा, बोर.

११.फुलांची नावे
उत्तर - कमळ, झेंडू ,चाफा, मोगरा, गुलाब.

१२ पक्षांची नावे
उत्तर - मोर, गरूड, बगळा, कावळा, पोपट.

१३.भाज्यांची नावे
उत्तर -- वांगे,  मेथी, कारले, बटाटा, भेंडी.

१४. धान्यांची नावे -
उत्तर -- गहू, ज्वारी, बाजरी,  भात, नाचणी.

१५. घरातील वस्तूंची नावे
उत्तर - पलंग, कपाट, घड्याळ, बादली, ताट.

१६.धातूंची नावे
उत्तर -- सोने, चांदी, पितळ, तांबे, लोखंड.

१७. नद्यांची नावे
उत्तर --गोदावरी, तापी, गंगा, नर्मदा, सावित्री.

१८.काचेच्या वस्तू
उत्तर - आरसा,  बरण्या, बांगड्या, बाटल्या.

१९. ज्ञानेंद्रियांची नावे
उत्तर -- कान, नाक, डोळा, जीभ, त्वचा.

२० औषधी वनस्पती
उत्तर - तुळस, कोरफड, हिरडा, बेहडा,वेखंड.

     संकलक:-शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
                  जि.प.प्रा शाळा बांडीकुहेर
                ता.साक्री जि.धुळे
                📞 ९४२२७३६७७५

Saturday, 15 July 2017

शब्दताल - बडबड गीत

            शब्दताल - बडबड गीत

धार धार धार धार -- अंधार
कार कार कार कार -- ओंकार
चार चार चार चार --   विचार
घार घार घार घार -- माघार
सार सार सार सार -- संसार
भार भार भार भार -- कुंभार
पार पार पार पार -- दुपार
दार दार दार दार -- उदार
कर कर कर कर -- भाकर
खर खर खर खर --  साखर
गर गर गर गर --  सागर
भर भर भर भर --  शंभर
तर तर तर तर  -- धोतर
सर सर सर सर  -- पसर
नर नर नर नर   -- वानर
दर दर दर दर   -- उदर
जर जर जर जर  -- गजर
कट कट कट कट -- चिकट
खट खट खट खट  -- तिखट
पट पट पट पट  -- पोपट
खळ खळ खळ खळ -- उखळ
मळ मळ मळ मळ   -- कमळ
पळ पळ पळ पळ  -- चपळ
दळ दळ दळ दळ  -- वादळ.
सळ सळ सळ सळ  -- उसळ
जळ जळ जळ जळ  -- काजळ
गन गन गन गन   -- गगन
मन मन मन मन  -- नमन
तन तन तन तन   -- रतन
वन वन वन वन   -- पवन
धन धन धन धन  -- सधन
मान मान मान मान  -- विमान
कान कान कान कान  -- दुकान
वळा वळा वळा वळा  -- कावळा
गळा गळा गळा गळा  -- बगळा
पळा पळा पळा पळा  -- सापळा
भळा भळा भळा भळा  - जांभळा
लाल लाल लाल लाल  -- गुलाल
कल कल कल कल  -- सकल
माल माल माल माल  -- रुमाल
शाल शाल शाल शाल  -- खुशाल
टक टक टक टक   -- नाटक
मत मत मत मत    -- गंमत

     लेखक:- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
                जि. प.प्रा. शाळा बांडीकुहेर
                 ता.साक्री जि.धुळे
                📞 ९४२२७३६७७५

Friday, 14 July 2017

बोला इंग्रजी, लिहा मराठी


            बोला इंग्रजी, लिहा मराठी

(1)बॅट, बाॅल, विकेट, बोलर, कॅप्टन, पॅडस

(2)ग्राउंड, टीम, टाॅस,अंपायर,कोच,रनर

(3)ट्राॅफी, पिच, प्लेअर, कॅरम,क्रिकेट

(4)पेन, पेन्सिल, डस्टर, बेन्च, पेपर,बेल,

(5) हेडमास्तर, आॅफिस, क्लर्क ,टेबल, फोन,

(6)चेअरमन, अजेंडा,  मिटिंग, हाॅल, बोर्ड

(7)बस, टॅक्सी, ड्रायव्हर, ट्रक, व्हॅन, कार

(8)मोटारसायकल, स्कूटर, टँकर, बोट

(9)स्टेशन, प्लॅटफॉर्म,  टिकिट, ट्रेन स्टॅण्ड

(10)जज, कोर्ट, पोलीस, केस, जेल

(11)डॉक्टर, पेशन्ट, इंजेक्शन,हाॅस्पिटल

(12)डिप्लोमा, मेरिट, डिग्री, इंजिनिअर,

(13)कण्ट्रॅक्टर, बिल, एजंट, बिल्डिंग, बिल्डर

(14) बस, ड्रायव्हर, कंडक्टर, पार्सल,रोड

(15) शर्ट,  पॅन्ट, फ्राॅक, कोट, टेलर,फोटो

(16) हाॅटेल, ग्लास, काॅफी, किटली, बाॅटल

(17)नोट, बँक, बजेट, मार्केट, गॅरंटी, आॅडिटर

(18)केक, ज्यूस, टाॅनिक,स्ट्राँ, कप, वेटर 

(19)डान्स, डान्सर, पेंन्टर,फॅशन,पार्लर

(20)कॅलेंडर, कॅमेरा, शूटींग, हिरो, काॅमेडी

(21)कुरिअर, पार्सल, रजिस्टर,रजिस्ट्रेशन

(22)टाइम, मिनिट, बाॅम्ब,टॅक्स फॉरेस्ट

(24)प्लेट,  ट्रे , गॅस, आॅईल,फॅक्टरी,बाॅक्स

(25)लाॅकेट, रिंग, टाॅवेल, गाॅगल,टाॅय

(26) रेडिओ, टीव्ही, कॅम्पूटर,बॅटरी,गेट

(27)चॉकलेट,फॅक्स, चॅनेल,काॅलेज, झेरॉक्स

(28)प्लास्टिक,बॅन्डेज, अॅम्ब्युलन्स, बेल्ट

(29) साॅक्स, सर्कस, सोफा,फर्निचर, कलर

(30)लायब्ररी ,क्लास,मार्क, हाफ,गॅप

      संकलक:-  शंकर चौरे (प्रा.शिक्षक)
                     जि.प.प्रा.शाळा बांडीकुहेर
                       ता.साक्री जि.धुळे
                      📞 9422736775

Thursday, 13 July 2017

उत्तरे शोधा (बेरीज)

      उत्तरे शोधा (बेरीज)

  लेखन :- शंकर चौरे(पिंपळनेर)धुळे
             ¤ ९४२२७३६७७५ ¤

(१) २० मध्ये किती मिळवले
      म्हणजे ३० होतील ?

-----     २० + □ = ३०

(२) कितीमध्ये १० मिळवल्यास
      ३० होतील ?

-----     □ + १० = ३०

(३) ४० आणि किती मिळून ७० ?

-----     ४० + □ = ७०

(४) किती आणि ३० मिळून ५० ?

-----     □ + ३० = ५०

(५) ३० कितीने वाढवले म्हणजे
      एकूण ८० होतील  ?

-----      ३० + □ = ८०

(६) किती आणि ४० मिळून
      ९० होतील  ?

----- □ + ४० = ९०

(७) ५० मध्ये किती मिळवल्यास
     १०० होतील  ?

-----   ५० + □ = १००

(८) कितीमध्ये २५ मिळवल्यास
      १०० होतील ?

-----   □ + २५ = १००

(९) कितीमध्ये ३०० मिळवून
       ५०० होतील  ?

-----    □ + ३०० = ५००

(१०) ३०० मध्ये किती मिळवले
        म्हणजे ५०० होतील ?

-----    ३०० + □ = ५००

उत्तरे :- (१) १०, (२) २०, (३) ३०
(४) २०, (५) ५०, (६) ५०,(७) ५०
(८) ७५, (९) २००, (१०) २००.

     लेखन :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
                  जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
                  ता. साक्री जि. धुळे
                 📞 ९४२२७३६७७५

Wednesday, 12 July 2017

उपक्रम

                 उपक्रम
   एकच शब्द दोन वेळा वापरून
   नवीन शब्द तयार करणे.
  
(१)  सर  -   सरसर

(२)  भर  - भरभर

(३)  घर  - घरघर

(४)  कर - करकर           
                                  
(५)  झर  - झरझर.         
                                  
(६)  तर  - तरतर.           
                                  
(७)  थर  - थरथर.          

(८)  धर  - धरधर.

(९)  वर  - वरवर.          
                                 
(१०) पट  - पटपट.        
                                
(११) चट  - चटचट.       
                                 
(१२)  कळ  - कळकळ.

(१३)  सळ  - सळसळ.

(१४)  खळ  - खळखळ.

(१५)  कण  - कणकण.

(१६)  खण  - खणखण.

(१७)  गार  - गारगार.

(१८)  धार  - धारधार.

(१९)  फड  - फडफड.

(२०)  हळू -  हळूहळू.

  लेखन :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
            जि.प प्रा.शळा बांडीकुहेर
            ता.साक्री जि. धुळे
             📞 ९४२२७३६७७५

Tuesday, 11 July 2017

एका शब्दात उत्तर सांगा.

                 
            एका शब्दात उत्तर सांगा.

      लेखन :- शंकर चौरे(पिंपळनेर) धुळे
                ¤ ९४२२७३६७७५ ¤

(१) लांब पिसे असलेला पक्षी-- मोर

(२) पक्ष्याचे तोंड  -- चोच

(३) पिसारा फुलवून नाचणारा पक्षी- मोर

(४) पक्षी यांच्यामुळे उडतात  -- पंख

(५) फणा असलेला प्राणी  -- नाग

(६) पोळी याची करतात  -- गहू

(७) हरभ-याचे  पीठ  -- बेसन

(८) भात याचे तयार करतात  -- तांदूळ

(९) दोन्ही हातांना बोटे  -- दहा.

(१०) गुरांचा अन्न -- चारा.

(११) तांदूळ शिजल्यावर तयार होतो -- भात.

(१२) कच्च्या कैर्‍यांचे बनवितात -- लोणचे.

(१३) शेंगदाण्यापासून मिळते -- तेल.

(१४ रवा -साखरेपासून तयार होतो - शिरा .

(१५) ऊसापासून तयार करतात -- गूळ.

(१६) फुगा यांच्यामुळे फुगतो -- हवा.

(१७) शेतात औत /नांगर ओढतात - बैल.

(१८) हत्तीचे  नाक -- सोंड.

(१९) बैल पूजेचा सण -- पोळा.

(२०तीळगूळ या सणाला वाटतात - मकरसंक्रांत.

(२१) सूर्य केव्हा उगवतो ?-- सकाळी.

(२२) सूर्य केव्हा मावळतो. -- संध्याकाळी.

(२३) लोकर मिळणारा प्राणी -- मेंढी.

(२४)फुलपाखरांच्या अळीला म्हणतात -सुरवंट.

(२५)फुलपाखराला किती पाय ? -- सहा.

     लेखन :- शंकर चौरे ( प्रा.शिक्षक)
                 जि.प शाळा बांडीकुहेर
                 ता.साक्री जि.धुळे
                 📞९४२२७३६७७५