चला शिकूया इंग्रजी (कविता)
चला शिकूया इंग्रजी
चला बोलूया इंग्रजी || धृ ||
माणसाला मॅन (MAN)
पंख्याला फॅन (FAN)
लेखणीला पेन (PEN)
कोंबडीला हेन (HEN) ||१||
मांजराला कॅट (CAT)
उंदराला रॅट (RAT)
टोपीला हॅट (HAT)
चटईला मॅट (MAT) ||२||
चेंडूला बाॅल (BALL)
उंचला टाॅल (TALL)
भिंतीला वाॅल (WALL)
पडण्याला फाॅल (FALL) ||३||
पुस्तकाला बूक (BOOK)
खिळ्याला हूक (HOOK)
पाहण्याला लूक (LOOK)
आचारीला कूक (COOK) ||४||
कोंबड्याला काॅक (COCK)
कुलूपला लाॅक (LOCK)
खडकाला राॅक (ROCK)
पायमोजाला साॅक (SOCK) ||५||
सूर्याला सन (SUN)
बंदूकीला गन (GUN)
पळण्याला रन (RUN)
गंमतीला फन (FUN) ||६||
पलंगाला काॅट (COT)
माठाला पाॅट (POT)
गरमला हाॅट (HOT)
ठिपक्याला डाॅट (DOT) ||७||
मुलाला बाॅय (BOY)
खेळणीला टाॅय ( TOY)
चटणीला साॅय (SOY)
आनंदाला जाॅय ( JOY) ||८||
सोन्याला गोल्ड (GOLD)
थंडला कोल्ड (COLD)
घडीला फोल्ड (FOLD)
विकण्याला सोल्ड (SOLD) ||९||
घंट्याला बेल (BELL)
सांगण्याला टेल (TELL)
विहिरीला वेल (WELL)
आगगाडीला रेल (RAIL) ||१०||
लेखक/कवी :-
शंकर चौरे (प्रा.शिक्षक)
जि.प.प्रा.शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि.धुळे
📞 9422736775
No comments:
Post a Comment