🔼 भाषिक खेळ 🔼
जिभेची वळकटी
संकलक :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे
९४२२७३६७७५
🔹उद्देश :- स्पष्ट व स्वच्छ उच्चार करता येणे.
🔹सूचना :- हा खेळ कितीही मुलांना खेळता
येईल. मुलांना गोलात उभे करावे.
खालीलपैकी कुठलाही एक शब्दसमूह घ्यावा.
प्रत्येकाने तो न अडखळता व न थांबता म्हणावा
जो अडखळेल तो बाद होईल. न अडखळता
जास्त वेळ म्हणू शकेल तो जिंकेल. असेच
आणखी शब्दसमूहही मुलांना शोधून काढता
येतील. नव्याने तयार करता येतील.
(१) कच्चा पापड पक्का पापड.
(२) कच्ची पपई पक्की पपई.
(३) काळे राळे गोरे राळे
राळ्यात राळे मिसळले.
(४) मोठं नाणं लहान नाणं.
(५) काळे कावळे गोरे बगळे.
(६) चटईला टाचणी टोचली.
संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment