(१) कागद बनवण्यासाठी काय वापरतात ?
उत्तर -- लाकूड किंवा बांबू.
(२)ऊसाच्या चिपाडांपासून काय तयार करतात ?
उत्तर -- मद्यार्क आणि कागद.
(३) महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता ?
उत्तर -- शेकरू ( मोठी खार )
(४) गवताच्या कोणत्या जातीपासून तेल निघते ?
उत्तर -- गवती चहा, रोशा, खस.
(५ ) पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास किती तास लागतात ?
उत्तर -- चोवीस तास.
(६) पृथ्वीवला सूर्याभोवती फिरण्यास किती वेळ लागतो ?
उत्तर -- एक वर्ष.
(७) बर्फाच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- ' इग्लू '
(८) थर्मामीटरमध्ये भरलेल्या चकचकीत पदार्थाचे नाव सांगा.
उत्तर -- पारा
(९) कोळी किड्याला किती पाय असतात ?
उत्तर -- आठ
(१०) पंख असणारा पण पिल्लांना दुध पाजणारा प्राणी कोणता ?
उत्तर -- वटवाघूळ
(११) वरून काटेरी व आत रसाळ, गोड गरे असलेले फळ कोणते ?
उत्तर -- फणस.
(१२) कोणत्या फळाची 'बी ' फळाच्या बाहेर असते ?
उत्तर -- काजू.
(१३) जेथे मीठ तयार करतात, त्या जागेला काय म्हणतात ?
उत्तर -- मिठागर.
(१४) सिमेंट तयार करण्यासाठी कोणते खनिज वापरतात ?
उत्तर -- चुनखडक .
---------------------------------------------------
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
जि. प.प्रा. शाळा बांडीकुहेर
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment