● Listen to your teacher and repeat
the words.
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
● वसंत,ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत व शिशिर
या सहा ऋतूंच्या वैशिष्ट्यांवर प्रश्नावली
अभ्यासूया.
● ऋतुचक्रानुसार निसर्गाचे बदलणारे रूप
मुलांना कळावे, हा उद्देश आहे.
(१) मुख्य ऋतू किती ?
--- तीन
(२) उप ऋतू किती ?
--- सहा
(३) मुख्य ऋतू कोणते ?
--- उन्हाळा, पावसाळा, हिवाळा.
(४) उप ऋतूंची नावे सांगा ?
--- वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर.
(४) कोणत्या ऋतूत आंब्याला मोहर येतो ?
--- वसंत
(५) कोणत्या ऋतूत कोकीळ कुहूकुहू करतो ?
--- वसंत
(६) सूर्य कोणत्या ऋतूत जास्त तापतो ?
--- ग्रीष्म
(७) कोणत्या ऋतूत आभाळ गडगडते ?
--- वर्षा
(८) कोणत्या ऋतूत वीज लखलखते व कडाडते ?
--- वर्षा
(९) कोणत्या ऋतूत ढग आभाळातून पळून जातात?
--- शरद
(१०) कोणत्या ऋतूत अंगात हुडहुडी भरते ?
--- हेमंत
(११) कोणत्या ऋतूत शेकोटीच्या भोवती
लोक गप्पा मारत बसतात ?
--- हेमंत
(१२) कोणत्या ऋतूत झाडाची पाने गळतात ?
--- शिशिर
(१३) सर्व रान हिरवेगार कोणत्या ऋतूत दिसते ?
--- शरद
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
९४२२७३६७७५
(१) चव माझी तुरट आहे,
चावायला निब्बरगट्ट आहे.
मला खाऊन पाणी पिल्यास गोड लागते,
केशतेलातही मला महत्त्व आहे.
मी कोण ? ओळखा.
(२) लाल लाल रंगाचा
मी गोल गोल अंगाचा.
माझ्या सारखीच आकाराने ती मोसंबी आहे
सगळ्या ऋतूंत मी मिळतो,
खा कोणत्याही आजारात,
टाॅनिकमध्येही मला भाव आहे.
सांगा सांगा नाव काय आहे ?
(३) उन्हाळ्यात मी झाडाला लागतो,
प्रत्येकजण मला खायला मागतो.
आंबट आणि गोड मी.
फळांचा राजा म्हणून मला भाव आहे,
सांगा माझे नाव काय आहे ?
(४) आतून लाल वरून हिरवा,
खाणा-याच्या पोटात गारवा.
तोड नाही माझ्यातल्या लालीला,
मी लागतो वेलीला.
उन्हाळ्यात मला भाव आहे,
सांगा माझे नाव काय आहे ?
(५) अंगावर माझ्या खवले,
माळावर मला लावले.
हिवाळ्यात मला बहर येतो,
बी काढून जो तो खातो.
रामाच्या पत्नीचे नाव जोडा.
पटकन हे कोडे सोडा.
------------------------------------------------
उत्तरे :- (१) आवळा , (२) सफरचंद ,
(३) आंबा , (४) टरबूज , (५) सीताफळ.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
९४२२७३६७७५
मराठी व्याकरण
● समास :-
कमीत कमी दोन शब्द एकत्र येऊन जो
नवीन जोडशब्द तयार होतो, या प्रक्रियेला
समास म्हणतात.
● सामासिक शब्द :-
दोन शब्द मिळून तयार होणाऱ्या नवीन
जोडशब्दाला सामासिक शब्द म्हणतात.
उदा. आई + वडील = आईवडील
प्रति + दिन = प्रतिदिन
● विग्रह :-
सामासिक शब्दांची फोड करून
दाखवण्याच्या पद्धतीला विग्रह म्हणतात.
सामासिक शब्द -- विग्रह
१. प्रतिदिन -- प्रत्येक दिवशी
२. आईवडील -- आई आणि वडील.
३. स्त्रीपुरूष -- स्त्री आणि पुरुष
४. सुखदु:ख -- सुख किंवा दुख
५. खरेखोटे -- खरे किंवा खोटे
६. मीठभाकर -- मीठ, भाकर वगैरे
७. केरकचरा -- केर, कचरा वगैरे
८. गद्यपद्य -- गद्य आणि पद्य
९. गंगायमुना -- गंगा आणि यमुना
१०. गुरूशिष्य -- गुरू आणि शिष्य
११. चंद्रसूर्य -- चंद्र आणि सूर्य
१२. दिवसरात्र -- दिवस आणि रात्र
१३. पतिपत्नी -- पती आणि पत्नी
१४. मातापिता -- माता आणि पिता
१५. राजाराणी -- राजा आणि राणी
१६. हातपाय -- हात आणि पाय
१७. दहाबारा -- दहा किंवा बारा
१८. मागेपुढे -- मागे किंवा पुढे
१९.हारजीत -- हार किंवा जीत
२०. नावगाव -- नाव गाव वगैरे
२१. मुलेबाळे -- मुले बाळे वगैरे
२२. नवरात्र -- नऊ रात्रींचा समूह
===========================
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
जि.प.प्रा. शाळा जामनेपाडा.
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. *धुळे*
📞९४२२७३६७७५
(१) भारत माता की...... जय !
(२) प्रजासत्ताक दिनाचा, विजय असो.. !
(३) तापी नदीचा धो धो पाणी,
आम्ही मुले हिंदुस्थानी.
(४) देश की रक्षा कौन करेंगे,
हम करेंगे, हम करेंगे !
(५)सारे शिकू या, देशाचा विकास करू या !
(६) जात - पातचे बांध तोडा,
भारत जोडा, भारत जोडा.
(७) मुलींना वाचवा, मुलींना शिकवा,
देशात साक्षरता वाढवा.
(८) जय जवान ! जय किसान !
(९) संविधान एक परिभाषा है
मानवता की आशा है
(१०) मिळून सारे देऊ ग्वाही
सक्षम बनवू लोकशाही
(११) लोकशाही गणराज्य घडवू
संविधानाचे भान जागवू
(१२) लोकशाहीचा सन्मान
हाच आमचा अभिमान.
(१३) सबसे प्यारा
देश हमारा
(१४) भारत देशाची महानता
विविधतेत एकता
(१५) अरे, सबके मुँह में एकही नारा
भारत हमारा सबसे प्यारा
(१६) भारत देशाची अफाट शक्ती,
मुक्तविचार अन् अभिव्यक्ती.
(१७) ऊठ, नागरिका, जागा हो,
देश रक्षणासाठी धागा हो.
(१८) जातीयतेच्या बेड्या तोडू,
सारा भारत जोडू.
(१९) भारताने दिला मान,
स्त्री-पुरुष एकसमान.
(२०) घरात कोणत्याही धर्माचे
समाजात मात्र देशाचे
(२१) समाजाला जागवू या,
लोकशाही रुजवू या..
(२२) लोकशाहीचे आश्वासन,
सर्वांना कायद्याचे संरक्षण.
(२३) मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण.
(२४) लेक माझी गुणाची, ओढ लागली ज्ञानाची.
(२५) आई मी शाळेत जाणार ,
शिकून घराला पुढे नेणार.
(२६) शाळेत पाठव मुलींना माय ,
घरी ठेवून करते काय.
(२७) लाजू नका, भिऊ नका.
शिकायची संधी सोडू नका.
(२८) आपल्या मुली जर शिकल्या छान ,
होईल आपल्या देशाचे कल्याण.
(२९) शिक्षणाची धरूया कास,
मुलींना शिकवू एकच ध्यास.
(३०) मुलगा, मुलगी एक समान ,
द्यावे त्यांना शिक्षण छान.
(३१) मुलांना लावा शाळेची गोडी,
बर्बाद होईल नाही तर पिढी.
(३२) चला धरूया शाळेची वाट,
अज्ञानाचा करू नायनाट.
===========================
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
जि.प.प्रा. शाळा जामनेपाडा.
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
📞९४२२७३६७७५
(१)आपण राष्ट्रीय सण उत्साहाने साजरे का करतो ?
-- आपल्यातील एकोपा टिकून राहावा व जोपासला
जावा, म्हणून आपण राष्ट्रीय सण उत्साहाने
साजरे करतो.
(२) कोणते राष्ट्रीय सण आपण साजरे करतो ?
-- 'स्वातंत्र्यदिन ' आणि 'प्रजासत्ताक दिन ' हे
राष्ट्रीय सण आपण साजरे करतो.
(३) १५ आॅगस्ट हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून
आपण का साजरा करतो ?
-- १५ आॅगस्ट १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र
झाला; म्हणून १५ आॅगस्ट हा दिवस दरवर्षी
आपण 'स्वातंत्र्यदिन' म्हणून साजरा करतो.
(४) २६ जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक
दिन म्हणून आपण का साजरा करतो.
-- आपल्या देशाचा राज्यकारभार लोकशाही
पद्धतीने करण्यास २६ जानेवारी १९५०
पासून सुरूवात झाली. म्हणून २६ जानेवारी
हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून
साजरा करतो.
(५) आपल्या देशाची कोणती तीन संरक्षक दले
दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात
सहभागी होतात ?
-- प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भूदल, नौदल
आणि हवाईदल ही देशाची तीन संरक्षक दले
सहभागी होतात.
(६) आपली राष्ट्रीय प्रतीके कोणती आहेत ?
-- राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व राजमुद्रा ही आपली
राष्ट्रीय प्रतीके आहेत.
(७) आपला राष्ट्रध्वज कोणता ?
-- आपला राष्ट्रध्वज तिरंगा आहे.
(८) आपले राष्ट्रगीत कोणते ?
-- 'जनगणमन ' हे आपले राष्ट्रगीत आहे.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
९४२२७३६७७५
● खालील घटना कोणत्या ज्ञानेंदियांमुळे
कळतात ते सांगा.
(१)कोकिळा गात आहे.
--- ear ( इअर ) - कान
(२) पावसामुळे बाग हिरवीगार झाली आहे.
--- eyes ( आइज ) - डोळे
(३) भेळ आंबट आहे.
--- tongue ( टंग ) - जीभ
(४) अत्तराचा वास छान आहे.
--- nose ( नोज ) - नाक
(५) संत्रे आंबट आहे.
--- tongue ( टंग ) - जीभ
(६) कैरीचा रंग हिरवा आहे.
--- eyes ( आइज ) - डोळे
(७) रस्ता खूप तापला आहे.
--- skin ( स्किन ) - त्वचा
(८) आभाळात इंद्रधनुष्य आहे.
--- eyes ( आइज ) - डोळे
(९) ढगांचा गडगडाट होत आहे.
--- ear ( इअर ) - कान
(१०) कपडे ओले आहेत.
--- skin ( स्किन ) - त्वचा
(११) जवळपास अगरबत्ती पेटवलेली आहे.
--- nose ( नोज ) - नाक
(१२) भाजीत मीठ जास्त झाले आहे.
--- tongue ( टंग ) - जीभ
(१३) कापूस मऊ आहे.
--- skin ( स्किन ) -- त्वचा
(१४) फणसाचे गरे गोड आहेत.
--- tongue ( टंग ) - जीभ
(१५) रेडिओवर छान गाणे लागले आहे.
--- ear ( इअर ) - कान
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
९४२२७३६७७५
(१) कडुलिंब --
कडुलिंब हा मोठ्या प्रमाणात आढळणा-या
वृक्षांपैकी एक आहे. कडुलिंब हा आकाराने
मोठे व सावली देणारा वृक्ष आहे. त्याच्या सर्व
अवयवांची चव ही कडूच असते. हा एक औषधी
वृक्ष आहे. तो भरपूर आजारावर एक रामबाण
उपाय म्हणून वापरला जातो. त्याचे लाकूड
इमारतीसाठी उपयुक्त आहे. या झाडाला कल्पवृक्ष
सुध्दा म्हणतात.
--------------------------------------------------
(२) नारळ --
नारळ हे फारच उपयुक्त झाड आहे. नारळाच्या
झाडाला फांद्या नसतात तरी ते उंच वाढते. ही
झाडे सर्वांत जास्त समुद्रकिनारपट्टीच्या भागात
वाढतात. नारळाचे बाहेरील कवच कठीण असते
व आत मधूरपाणी असते. आतील खोब-यापासून
तेल काढतात,ते केसांकरीता व त्वचेसाठी उपयुक्त
आहे. नारळाच्या प्रत्येक अवयवाचा उपयोग होतो.
नारळाला कल्पवृक्ष म्हणून ओळखतात.
--------------------------------------------------
(३) बेल --
बेल हे असे झाड आहे, ज्याचा प्रत्येक अवयव
स्वास्थ्य व सौंदर्य वाढविण्यासाठी उपयुक्त आहे.
याच्या फळावर कठीण कवच असते व आतमध्ये
मधूर गर असतो. बेलाचे फळ फार काळापर्यंत
वापरण्यायोग्य राहते. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर
प्रमाणात असते. बेलाच्या पिकलेल्या फळापेक्षा
कच्चे फळ जास्त बहूगुणी आहे. या फळाचा
मुरंबा करतात.
--------------------------------------------------
(४) फणस --
फणस हे फळ आकाराने फार मोठे असते.
फणसाला बाहेरून काट्यासारखी अनेक टोके असतात. फणसाच्या आत गरे असतात. एका
ग-यामध्ये एक बी असते. फणसाची भाजीसुध्दा
करतात. फणस पिकल्यावर त्याचे गरे मधूर व
गोड लागतात.
--------------------------------------------------
(५) आंबा --
आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे. आंबा
कच्चा असतांना आंबट तर पिकल्यानंतर तो
गोड लागतो. आंब्याच्या बी ला कोय म्हणतात.
त्यावर कठीण आवरण असून त्याची बी ही
द्विबिजपत्री असते. हापूस आंबा ही आंब्याची
एक जात प्रसिद्ध आहे.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
९४२२७३६७७५
(१)पाणवठा --
--- गावातील लोकांची एकत्र पाणी भरण्याची जागा.
(२) पाणबुडी --
--- पाण्याखाली चालणारी बोट.
(३) धबधबा --
--- उंचावरून कोसळणारा पाणलोट.
(४) उपळी --
--- जमिनीतून पाझरणारा झरा.
(५) उत्तरायण --
--- सूर्याचे उत्तरेकडे सरकणे.
(६) कृष्णपक्ष --
--- अंधाऱ्या रात्रीचा पंधरवडा.
(७) चांदणे --
--- चंद्रापासून येणारा प्रकाश.
(८) झड --
--- सतत कोसळणारा पाऊस.
(९) परिसर --
--- भोवतालचा प्रदेश.
(१०) बेट --
--- चारही बाजूंनी पाणी असलेला भूप्रदेश.
(११) पहाट --
--- सूर्योदयापूर्वीचा काळ.
(१२) संगम --
--- दोन नद्या एकत्र मिळण्याचे ठिकाण.
(१३) संधीप्रकाश --
--- सूर्योदयापूर्वीचा किंवा सूर्यास्तानंतर दिसणारा प्रकाश .
(१४) डोह --
--- नदीतील खोलगट भागातील खोल पाणी.
(१५) मचाण --
--- शिकारीसाठी उंच बांधलेला माळा.
(१६) पंचक्रोशी --
--- पाच कोसांचा प्रदेश.
(१७) क्षितिज --
--- जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे
दिसते ते ठिकाण.
(१८) बोगदा --
--- डोंगर पोखरून आरपार तयार केलेला रस्ता.
(१९) तट --
--- किल्ल्याच्या भोवतालची संरक्षक भिंत.
(२०) आकाशगंगा --
--- आकाशातील ताऱ्यांचा पट्टा.
===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक)
जि.प.प्रा. शाळा जामनेपाडा
केंद्र- रोहोड, ता. साक्री जि.धुळे
९४२२७३६७ ७५
(१) हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात ?
--- पाडस / शावक
(२) पक्ष्यांच्या समूहाला काय म्हणतात ?
--- थवा
(३) मधमाश्यांच्या घराला काय म्हणतात ?
--- पोळे
(४) मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात ?
--- कोकरू
(५ ) बांबूच्या समूहाला काय म्हणतात ?
--- बेट
(६) घोड्याच्या घराला काय म्हणतात ?
--- तबेला / पागा
(७) गाईच्या पिल्लाला काय म्हणतात ?
--- वासरू
(८) फुलझाडांच्या समूहाला काय म्हणतात ?
--- ताटवा
(९) पक्ष्यांचा राजा कोणाला म्हणतात ?
--- गरूड
(१०) म्हशीच्या पिल्लाला काय म्हणतात ?
--- रेडकू
(११) फुलांच्या समूहाला काय म्हणतात ?
--- गुच्छ
(१२) गायीच्या ओरडण्याला काय म्हणतात ?
--- हंबरणे
(१३) वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात ?
--- बच्चा / बछडा
(१४) सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात ?
--- छावा
(१५) म्हशीच्या ओरडण्याला काय म्हणतात ?
--- रेकणे
(१६) माकडाचा खेळ करणाऱ्याला काय म्हणतात ?
--- मदारी
(१७) अस्वलाचा खेळ करणाऱ्याला काय म्हणतात
--- दरवेशी
(१८) बैलाच्या मादीला काय म्हणतात ?
--- गाय
(१९) कोकिळेने केलेला आवाज कोणता ?
--- कुहूकुहू
(२०) प्राण्यांचा राजा कोणाला म्हणतात ?
--- सिंह
===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
जि.प.प्रा. शाळा जामनेपाडा.
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
📞९४२२७३६७७५
🔹प्रात्यक्षिक --
बाल आनंद मेळाव्यात एकूण दहा दालने
तयार केली.
🔯{ चित्रकला दालन -- १ }
(१)चित्र काढणे व रंगवणे :- को-या कागदावर
चित्र काढणे व रंगवणे.
(२) कोलाज करणे - रंगीत घोटीव पेपरचे
आकार कापून पांढऱ्या कागदावर
डिंकाने चिकटवणे. बिया, सालकटं,फुल
याद्वारे कोलाज तयार करणे.
--------------------------------------------------
🔯 { चित्रकला दालन -- २ }
(१) ठसे काम :- वेगवेगळ्या ठशांद्वारे चित्र
साकारणे व रंगवणे. रंगात बुडवून भेंडी
व भाजीचे ठसे काढणे. हाताच्या बोटांचे
अंगठ्याचे ठसे काढून प्राणी व पक्ष्यांचे
चित्र तयार करणे.
--------------------------------------------------
🔯 { कागदकाम दालन --३ }
(१)कागदाच्या वेगवेगळ्या वस्तू तयार करणे.
(२)कागदाच्या तुकड्यांना जोडून वेगवेगळे
आकार तयार करणे.
--------------------------------------------------
🔯 { कागदकाम दालन -- ४ }
(१) टोप्या तयार करणे :- वर्तमान पत्राच्या
कागदाचा उपयोग करून वेगवेगळ्या
आकाराचे टोप्या तयार करणे व डोक्यात घालणे.
(२) रद्दी पेपरचे आकार तयार करून त्याचा
वापर करणे. उदा. शंकू आकार बोटात
कव्हर घालणे. कागदाचा झगा.
(३) कागदाच्या ओरिगामी कला वस्तू तयार करणे.
-------------------s. s. chaure ------------
🔯 { रांगोळी दालन -- ५ }
(१)रंगीत व पांढऱ्या रांगोळीचा वापर करून
रांगोळी काढणे :- नक्षी, फ्री हॅण्ड, मुक्त
चित्र, संस्कार भारती रांगोळी काढणे.
(२) वेगवेगळ्या वस्तू वापरून रांगोळी काढणे.
उदा. रंगीत खडे, शिंपले, बिया, शंख इ.
रांगोळी काढणे.
-------------------------------------------------
🔯 { मनोरंजन खेळ-- ६ }
डोळे बांधून :-
(१) गाढवाला शेपूट लावणे.
(२) काठीने मडके फोडणे.
(३) जाळीत बाॅल टाकणे.
-------------------------------------------------
🔯 { संगीत दालन -- ७ }
(१) विविध वाद्ये वाजवणे व आनंद घेणे.
(२) गायन करणे.
(३) संगीत खुर्ची.
(४) गाण्यांच्या चालीवर कृतीयुक्त गाणे म्हणणे.
(५) मुक्त नृत्य करणे.
------------------------------------------------
🔯 { खाद्यपदार्थ दालन -- ८ }
(१) विद्यार्थ्यांनी घरून करून आणलेले
पदार्थ विक्री करणे. उदा. पापड.
-------------------------------------------------
🔯 { मनोरंजक खेळ -- ९ }
(१) बादलीत चेंडू टाकणे.
(२) वस्तुत रिंग टाकणे.
(३) फुग्याला बाण मारणे.
-------------------------------------------------
🔯 { बाजार मंडई दालन -- १० }
(१) विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या खेळणी, वस्तू
या बाजारात मंडई मध्ये विक्री करणे.
(२) विविध शैक्षणिक वस्तू ,पुस्तके,आकर्षक
पिशव्या, फोटो फ्रेम इ.
-------------------------------------------------
✔ फायदे :--
(१)बाल आनंद मेळाव्यातून निखळ आनंद
मिळतो.
(२)आनंदातून उत्साह व कृती करण्यासाठी
प्रेरणा मिळते.
(३)विविध छंदाची जोपासना होते.
टिप :-हा उपक्रम प्रत्येकाने आपल्या शाळेत
राबविण्याचा प्रयत्न करावा.
संकल्पना :- शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक)
जि.प प्रा.शाळा जामनेपाडा
ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५