(१) वेरूळच्या लेण्यांविषयी माहिती :-
--- औरंगाबाद जिल्ह्य़ात वेरूळ येथे
जगप्रसिद्ध लेणी आहेत. बालाघाटच्या
टेकडीत १२ बौद्ध, १७ हिंदू आणि ५ जैन
धर्मियांची लेणी आहेत. राष्ट्रकूट राजा दंतिदुर्ग
याच्या काळात विख्यात कैलास लेण्याच्या
खोदकामस सुरूवात झाली व आठव्या शतकात
पहिला कृष्णराज याच्या काळात ते पूर्णत्वास
गेले. येथील स्थापत्य,मंदिर स्थापत्य,शिल्पकला
या सर्वच दृष्टीने ही लेणी अजोड आहेत.
या पाषाणमंदिराच्या गोपूर, नंदीमंडप, ध्वज-
मंडप, मुख्य मंडप, गाभारा, शिखर, लंकेश्वर
मंदिर, सरिता मंदिर इत्यादी वास्तू प्रेक्षणीय
आहेत. शैलमंदिर या शिल्पप्रकारातील कैलास
मंदिर हा कोरीव कामाचा एक उत्तम नमुना आहे.
=============================
(२) अजिंठा लेणीविषयी थोडक्यात माहिती :-
--- (१)औरंगाबाद जिल्ह्य़ात सातमाळ पर्वतरांगेत
अजिंठा येथे ३० बौद्धधर्मीय लेणी आहेत.
वाकाटक घराण्यातील शेवटचा राजा हरिषेण
याच्या काळात १६ व्या क्रमांकाचे लेणे खोदले
गेले. (२) या लेण्यांत बुद्धाच्या जीवनातील प्रसंग
व जातकथा कोरलेल्या आहेत. शिल्पांतील विपुल
विविधता, भावपूर्णता, सुबक व नाजूक नक्षीकाम,
भव्य मूर्ती व नैसर्गिक रंगांचा वापर ही या
शिल्पांची वैशिष्ट्ये होत. (३) क्रमांक १ च्या
लेण्यामधील बुद्धाच्या एकाच मूर्तीच्या चेह-या -
वरील स्मित, विषाद व ध्यान हे तीन भाव
विविध कोनांतून स्पष्ट दाखवणारे शिल्प
अप्रतिम आहे.
=========================
संकलन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment