माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Sunday, 6 January 2019

सामान्यज्ञान -- दोन दोन नावे सांगा.

(१) कोणत्या प्राण्यांना प्रवासी प्राणी म्हटले जाते  ?

---  घोडा,   उंट .

(२) पशूंच्या (प्राण्यांच्या) मूलभूत गरजा कोणत्या ?

---  अन्न ,  निवारा.

(३) धागे देणाऱ्या वनस्पतींची नावे सांगा  ?

---  अंबाडी,  कापूस.

(४) चुबंकाकडे आकर्षिल्या जाणाऱ्या पदार्थांची नावे सांगा.

---  लोह ,   कोबाल्ट.

(५) चुबंकाकडे आकर्षिल्या न जाणाऱ्या पदार्थांची नावे सांगा.

---  रबर,   तांबे.

(६) जमिनीतून मिळणारी नैसर्गिक संपत्ती कोणती  ?

---  माती  ,  दगडी कोळसा .

(७) वनांतुन मिळणारी नैसर्गिक संपत्ती कोणती  ?

---  लाकूड,  मध .

(८) मातीपासून केलेली पाणी साठवण्याची भांडी कोणती  ?

---  मडकी,   रांजण.

(९) तेल कोणत्या पदार्थांपासून मिळते  ?

---  शेंगदाणे, करडई.

(१०) आंबट फळे कोणती  ?

---  लिंबू  ,  चिंच.

(११) जीवावरणाचे कोणते घटक आहेत  ?

---  वनस्पती ,  प्राणी

(१२) औषधी वनस्पतींची नावे सांगा.

---  आवळा,  बेहडा.

===========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर  साक्री, जि. धुळे
             📞९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment