(१) चव माझी तुरट आहे,
चावायला निब्बरगट्ट आहे.
मला खाऊन पाणी पिल्यास गोड लागते,
केशतेलातही मला महत्त्व आहे.
मी कोण ? ओळखा.
(२) लाल लाल रंगाचा
मी गोल गोल अंगाचा.
माझ्या सारखीच आकाराने ती मोसंबी आहे
सगळ्या ऋतूंत मी मिळतो,
खा कोणत्याही आजारात,
टाॅनिकमध्येही मला भाव आहे.
सांगा सांगा नाव काय आहे ?
(३) उन्हाळ्यात मी झाडाला लागतो,
प्रत्येकजण मला खायला मागतो.
आंबट आणि गोड मी.
फळांचा राजा म्हणून मला भाव आहे,
सांगा माझे नाव काय आहे ?
(४) आतून लाल वरून हिरवा,
खाणा-याच्या पोटात गारवा.
तोड नाही माझ्यातल्या लालीला,
मी लागतो वेलीला.
उन्हाळ्यात मला भाव आहे,
सांगा माझे नाव काय आहे ?
(५) अंगावर माझ्या खवले,
माळावर मला लावले.
हिवाळ्यात मला बहर येतो,
बी काढून जो तो खातो.
रामाच्या पत्नीचे नाव जोडा.
पटकन हे कोडे सोडा.
------------------------------------------------
उत्तरे :- (१) आवळा , (२) सफरचंद ,
(३) आंबा , (४) टरबूज , (५) सीताफळ.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment