■ व्याकरण ■
● वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक
शब्दाला क्रियापद म्हणतात.
उदा. खातो, करतो, जाते.
● क्रियापदाच्या रूपावरून त्याने दाखवलेली
क्रिया कधी घडते, याचा जो बोध होतो;
त्याला काळ म्हणतात.
● मराठी भाषेत प्रमुख तीन काळ आहेत.
(१) वर्तमानकाळ (२) भूतकाळ
(३) भविष्यकाळ.
(१) वर्तमानकाळ :-
--- जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता म्हणजे वर्तमानात घडते.असा बोध होतो; तेव्हा
त्या क्रियापदाचा वर्तमानकाळ असतो.
उदा. गाय चारा खाते.
(२) भूतकाळ :-
--- जेव्हा क्रियापदाचा रूपावरून क्रिया पूर्वी
घडली आहे, असा बोध होतो; तेव्हा त्या
क्रियापदाचा भूतकाळ असतो.
उदा. गाईंने चारा खाल्ला.
(३)भविष्यकाळ :-
--- जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया
पुढे घडेल, असा बोध होतो; तेव्हा त्या
क्रियापदाचा भविष्यकाळ असतो.
उदा. गाय चारा खाईल.
=========================
■ क्रियापदांचे काळ अभ्यासू या :-
वर्तमानकाळ =भूतकाळ=भविष्यकाळ
(१) आहे - झाली - होईल.
(२) आहेत - होते - असतील
(३) आहेस - होतास - होशील
(४) उगवतात- उगवतील -उगवतील
(५) करता - केले - कराल
(६) करतात - केली - करतील
(७) करते - केला - करील
(८) खोदतात - खोदले - खोदतील
(९) घेतो - घेतली - घेईल
(१०) चालते - चालली - चालेल
(११) जगतात - जगले - जगतील
(१२) जातात - गेले - जातील
(१३) जातो - गेला - जाईल
(१४) झोपवतो - झोपवेल - झोपवू
(१५) ठेवतो - ठेवले - ठेवेल
(१६) देतो - दिली - देणार
(१७) नाही - नव्हता - नसेल
(१८) पडतो - पडला - पडेल
(१९) पडतात - पडल्या - पडतील
(२०) पोहोचते - पोहोचली -पोहोचेल
(२१) पोचतात - पोचले - पोचतील
(२२) मिळते - मिळाली - मिळेल
(२३) येते - आले - येईल
(२४) रंगवतो - रंगवली - रंगवेल
(२५) राहतात - राहिल्या - राहातील
(२६) लागते - लागली - लागेल
(२७) लावतात - लावले - लावतील
(२८) वाटते - वाटले - वाटेल
(२९) शिरतो - शिरला - शिरेल
(३०) शोधतो - शोधले - शोधेल
(३१) सांगतो - सांगितली - सांगतील
(३२) सुचले - सुचली - सुचेल
=================================
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
पिंपळनेर साक्री, जि. धुळे
📞९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment