(१) अवकाश प्रक्षेपण म्हणजे काय ?
---- पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात
प्रक्षेपित करण्यासाठी, म्हणजेच एखाद्या
वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या
बाहेर पाठवण्यासाठी वापरण्यात येणारे
तंत्र म्हणजे 'अवकाश प्रक्षेपण ' म्हणतात.
(२)अवकाश प्रक्षेपणासाठी कशाचा उपयोग
करतात ?
--- अवकाश प्रक्षेपणासाठी अग्निबाणाचा
उपयोग करतात.
(३) अवकाश प्रक्षेपणात अग्निबाणाचा उपयोग
कशासाठी करतात ?
--- अवकाश प्रक्षेपणात अग्निबाणाचा उपयोग
करून कृत्रिम उपग्रह, अवकाशयाने इत्यादी
यंत्रे अवकाशात सोडली जातात.
(४) अवकाश तंत्रज्ञानाचे उपयोग सांगा.
--- अवकाश प्रक्षेपणाद्वारे अवकाशात सोडलेली
अवकाशयाने व अवकाशस्थ प्रयोगशाळा यांच्या
साहाय्याने सूर्यमालेतील इतर ग्रह, वातावरण,
सौरशक्ती, अवकाश, विश्वाची व्याप्ती इत्यादी-
विषयी माहिती मिळवणे शक्य झाले आहे.
(४) अवकाशात सोडलेली कृत्रिम उपग्रहांचे
उपयोग सांगा.
--१. कृत्रिम उपग्रहांच्या साहाय्याने दूरचित्रवाणी,
रेडिओ, दूरध्वनी, मोबाईल फोन, फॅक्स,
इंटरनेट इत्यादी संदेशवहनाच्या अत्याधुनिक
साधानांद्वारे जगाच्या सर्व भागांत सुलभपणे
संदेशवहन करता येते. उदा. कृत्रिम उपग्रहांच्या
साहाय्याने एखाद्या ठिकाणी सुरू असलेला
खेळाचा सामना त्याचवेळी संपूर्ण जगाला
पाहता येतो. २. कृत्रिम उपग्रहांद्वारे वातावरणातील
बदल, वादळाचा धोका इत्यादींविषयी माहिती
मिळवता येते.
(५) भारताच्या अवकाश संशोधन कार्याची
थोडक्यात माहिती सांगा.
--- १. भारताच्या अवकाश संशोधनाची सुरूवात
डाॅ. होमी भाभा व डाॅ. विक्रम साराभाई यांच्या
नेतृत्वाखाली झाली. २. भारताने १९६९ मध्ये
थुंबा येथून पहिला अग्निबाण अवकाशात सोडला.
३. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर श्रीहरीकोटा हे
अवकाश प्रक्षेपण केंद्र १९७१ साली उभारण्यात
आले. भारताने या केंद्रातून आजपर्यंत अवकाश
प्रक्षेपणाचे अनेक कार्यक्रम केले आहेत. भारताने
या केंद्रातून २८ एप्रिल २००८ रोजी PSL V -
C9 या अग्निबाणाद्वारे एकाच वेळी १० कृत्रिम
उपग्रह अवकाशात सोडण्याचा विक्रम केला आहे.
४. भारताने १४ नोव्हेंबर २००८ रोजी चंद्राच्या
अभ्यासासाठी अवकाशात चांद्रयान पाठवण्यात
यश मिळवले आहे. ५. भारतात अहमदाबाद,
हैदराबाद, हसन, बंगळूर, श्रीहरीकोटा, थुंबा,
तिरुवनंतपुरम या ठिकाणी प्रमुख अवकाश
संशोधन केंद्रे आहेत.
=================================
संकलन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
पिंपळनेर साक्री, जि. धुळे
📞९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment