माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 27 April 2019

पर्यटनामागील हेतू जाणून घेऊया  !

  पर्यटनामागे अनेक हेतू वा प्रेरणा असतात. त्या पुढीलप्रमाणे --

(१) ऐतिहासिक वास्तू, किल्ले तसेच उत्खननात सापडलेली गावे - शहरे पहाणे.

(२) प्राचीन कलानिर्मितीची केंद्र,संग्रहालये पहाणे.

(३) विविध तीर्थस्थळांना भेटी देणे.

(४) समुद्रकिनारे, घनदाट जंगले, हिमशिखरे,
नद्यांचे संगम, कास पठारासारखी वैशिष्ट्यपूर्ण
पठारे, फ्लॉवर आॅफ व्हॅलीसारख्या द-या -
पर्वत अशा निसर्गरम्य स्थळांचा अनुभव व आनंद घेणे.

(५)निरनिराळ्या औद्योगिक प्रकल्पांना भेटी देणे.

(६)औषधी वनस्पती पाहणे, संशोधन करणे,
     वैद्यकीय उपचार घेणे अशा आरोग्यपूरक
     कारणांसाठी पर्यटन करणे.

(७) फळबागा, शेती प्रकल्प, खतनिर्मिती प्रकल्प आदींसाठी केलेले कृषी पर्यटन.

(८)खेळांच्या निमित्ताने केले जाणारे क्रीडा पर्यटन.

(९) नृत्य, संगीत महोत्सव यांत भाग घेणे वा प्रेक्षक म्हणून जाणे हे सांस्कृतिक पर्यटन.

(१०) याशिवाय फिल्म फेस्टिव्हल, चित्रपट
चित्रीकरण, विज्ञान संमेलने, आंतरराष्ट्रीय परिषदा,
संवाद, पुस्तक प्रदर्शने, साहित्य संमेलने इत्यादी निमित्तानेही लोक पर्यटन करीत असतात.
     
===========================
संकलक:- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
               जि.प.प्रा. शाळा जामनेपाडा.
               केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
             📞९४२२७३६७७५

  
 
  

Wednesday, 24 April 2019

भारतीय समुद्र किनारपट्टीचे महत्व

(१) भारतीय समुद्र किनारपट्टीवर पर्यटन -
     स्थळांचा विकास चांगला झालेला आहे.

(२) मुंबईजवळील जुहू , गिरगाव, श्रीवर्धन व
    गोवा,केरळ, चेन्नई इत्यादी किनारे पर्यटकांचे आकर्षण आहेत.

(३) भारतीय मुख्य किनारपट्टीवर एकूण प्रमुख
     गोष्टीत १२ (बारा ) बंदरे असून त्यांचा
     वापर आंतरराष्ट्रीय दळणवळण, आयत     निर्यातीसाठी होतो.

(४) किनारपट्टीवर असणाऱ्या खाड्या,  सरोवर
      यातून जलवाहूक चालते.  ही वाहतूक
      इतर वाहतुकीच्या तुलनेने स्वस्त व प्रदूषणमुक्त असते.

(५) भारतीय किनारपट्टीवर मासेमारी व्यवसाय
      खूप मोठ्या प्रमाणावर चालतो.

(६) भारतीय किनारपट्टीवर मीठ गोळा
      करणाचा व्यवसाय खूप मोठा आहे.

(७) किनारपट्टी भागात आधुनिक पर्यटन
      व्यवसाय खूप वेगाने विकसित होत आहे.
   
===========================
संकलक:- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
               जि.प.प्रा. शाळा जामनेपाडा.
               केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
             📞९४२२७३६७७५

Monday, 22 April 2019

नद्यांविषयी भौगोलिक माहिती

(१) महाराष्ट्रातील पश्चिमवाहिनी नद्या --

---  नर्मदा,  तापी,  वैतरणा,   उल्हास,
    सावित्री, वाशिष्ठी,  शास्त्री,  तेरेखोल.
-------------------------------------------------

(२) महाराष्ट्रातील पूर्ववाहिनी नद्या --

---   गोदावरी,  भीमा,  कृष्णा.
--------------------------------------------------

(३) महाराष्ट्रातील दक्षिणवाहिनी नद्या --

---  वर्धा,  वैनगंगा,  इंद्रावती.

-------------------------------------------------

(४) तापी नदीच्या उपनद्या --

---  पांझरा,  पूर्णा,  गिरणा.

--------------------------------------------------

(५) गोदावरी नदीच्या उपनद्या --

---  प्रवरा,  सिंदफणा,  दुधना, 
    प्राणहिता,  इंद्रावती.

--------------------------------------------------

(६) भीमा नदीच्या उपनद्या --

---  घोड,  नीरा,  सीना,  माण.

-------------------------------------------------

(७) कृष्णा नदीच्या उपनद्या --

---  कोयना,  येरळा,  वारणा,  पंचगंगा.

=================================
संकलक  :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक )
                पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
                ९४२२७३६७७५

Saturday, 20 April 2019

वैज्ञानिक कारणे सांगा पाहू  ?

(१) जंगलात वृक्ष उंच वाढतात.

---  जंगलात वनस्पतींची  दाटी असते.
      आवश्यक इतका सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी
      जंगलात वृक्ष उंच वाढतात.
--------------------------------------------------

(२) वाघाची चाहूल भक्ष्यास लागत नाही.

---  वाघाच्या पायांच्या तळव्यांना गादी
      असते, तो भक्ष्याच्या दिशेने दबकत दबकत
      चालतो. त्यामुळे त्याची चाहूल भक्ष्यास लागत नाही.
------------------------------------------------

(३) बदक पाण्यात असताना ओले का होत नाही  ?

---  बदकाच्या पंखावर आणि पिसांवर तेलकट
      थर असल्याने त्यावरून पाणी ओघळून जाते.
      म्हणून पाण्यात बदक ओले होत नाही.
-------------------------------------------------

(४) समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त असते  ?

---  समुद्राच्या पाण्यात बरेच क्षार असतात.
      त्यामुळे त्या पाण्याची घनता जास्त असते.
--------------------------------------------------

(५) सौर चुलीतील भांड्यांना बाहेरून काळा रंग का लावलेला असतो  ?

---  काळा रंग जास्त उष्णता शोषून घेतो,
      म्हणून सौर चुलीतील भांड्यांना बाहेरून
      काळा रंग लावलेला असतो.
-------------------------------------------------

(६) उन्हात क्रिकेट खेळतांना पांढरे कपडे
     का घालतात  ?

---  पांढरे कपडे उष्णता शोषून घेत नाहीत,
      म्हणून उन्हात क्रिकेट खेळतांना पांढरे कपडे घालतात.

===============================
संकलक  :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक )
                पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
                ९४२२७३६७७५

Friday, 19 April 2019

हसत खेळत मूल्यांचे शिक्षण

( मूल्यांवर आधारित उपक्रम )

राष्ट्रभक्ती -
   (१)राष्ट्रभक्तीपर गीतेपाठ करून घेणे.
   (२)क्रांतिकारकांच्या कथा सागणे.
--------------------------------------------

श्रमप्रतिष्ठा -
   (१)वर्ग / परिसर स्वच्छ ठेवणे.
   (२)आईला घरकामात मदत करणे.
-------------------------------------------

स्त्री-पुरूष समानता -
   (१)हजेरी पटावर मुलींचे नाव प्रथम लिहीणे.
   (२)वर्गाचे प्रतिनिधीत्व मुलाप्रमाणे मुलींनाही देण्यात यावे.
---------------------------------------------
        
सर्वधर्म समभाव -
   (१)सर्व धर्मियांच्या सणांची माहिती घेणे.
   (२)समतेच्या घोषणेचा संग्रह करणे.
-----------------------------------------------

राष्ट्रीय एकात्मता-
   (१)राष्ट्रीय प्रतिकांचा अर्थ सांगणे.
   (२)राष्ट्रीय प्रतिकांचा संग्रह करणे.
---------------------------------------------

 वैज्ञानिक दृष्टीकोन-
  (१)घटनांचा कार्यकारणभाव सांगणे .
       उदा. जलचक्र
  (२)स्वच्छतेचे महत्तव संगणे.
--------------------------------------------

संवेदनशिलता -
(१)समाज सेवकांच्या जीवनातील गोष्टी सांगणे.
(२)अनाथश्रम,वृध्दाश्रम,सेवाभावी संस्थाची माहिती देणे.
-----------------------------------------------

वक्तशीरपणा -
 (१)शाळेत वेळेत उपस्थित राहणे.
 (२)दररोजचा अभ्यास दररोज वाचणे.
----------------------------------------------

सौजन्यशीलता -
   (१)नम्रतेने हळू आवाजात बोलणे.
   (२)अंध,अपंग यांना मदत करणे.
--------------------------------------------

नीटनेटकेपणा -
  (१)दप्तर व्यवस्थित ठेवणे.
  (२)स्वतःचे कपडे स्वच्छ व व्यवस्थित ठेवणे.

================================

संकलक  :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक )
                पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
                ९४२२७३६७७५

Monday, 15 April 2019

' र ' ची करामत ( ' र ' ची साखळी )


(१) पाण्यात राहणारे प्राणी -- जलचर
(२) लिहिता , वाचता येणारा-- साक्षर
(३) लिहिता - वाचता न येणारा - निरक्षर
(४) बातमी आणून देणारा -- वार्ताहर
(४) वनात राहणारे प्राणी -- वनचर
(५) जमिनीवर राहणारे -- भूचर
(६) धान्य साठवण्याची जागा -- कोठार
(७) जमिनीखालून गेलेला रस्ता -- भुयार
(८) कथा(गोष्ट ) लिहिणारा -- कथाकार
(९) दगडावर मूर्ती घडवणारा - शिल्पकार
(१०) जादूचे खेळ करून दाखवणारा -- जादूगार
(११) नाटक लिहिणारा -- नाटककार
(१२) चित्रे काढणारा -- चित्रकार
(१३) खूप दानधर्म करणारा  -- दानशूर
(१४) शत्रूला सामील झालेला  -- फितूर
(१५) शत्रूकडील बातम्या काढणारा -- हेर
(१६) भारताचा राष्ट्रीय पक्षी -- मोर
(१७) एक पाळीव प्राणी -- मांजर
(१८) पाण्यातील एक प्राणी -- मगर
(१९) झाडावर सरसर चढणारा प्राणी -- खार
(२०) एक सरपटणारा प्राणी  -- अजगर
(२१) मसाल्याचा एक पदार्थ  -- केशर
(२२) मोराच्या मादी  --    लांडोर
(२३) मीठ तयार करतात ते ठिकाण - मिठागर
(२४) लोखंडी वस्तू तयार करणारा -   लोहार
(२५) सोन्या -चांदीचे दागिने बनवणारा - सोनार
(२६) मातीची मडकी बनवणारा --  कुंभार
(२७) आजारी लोकांना औषधे देणारा -  डाॅक्टर
(२८) लाकडी वस्तू तयार करणारा --  सुतार 
(२९) चामड्याच्या चपला बनवणारा - चांभार
(३०) केळ्यांचा (घड) समूह -- लोंगर
(३१) महाराष्ट्राची उपराजधानी - नागपूर
(३२) एक कडधान्य -- मसूर
(३३) एक बी असणारे एक फळ --  बोर
(३४) एक शेंग भाजी  --  गवार
(३५) या वनस्पतीपासून कात काढतात -- खैर
(३६) हातमागावर कापड विणणारा   -- विणकर
(३७) एक गोड पदार्थ  -- साखर
(३८) खा-या पाण्याचा मोठा साठा -- महासागर
(३९) लांबी मोजण्याचे प्रमाणित एकक - मीटर
(४०) पाण्याचा एक स्त्रोत  -- विहीर
संकलक  :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक )
                पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
                ९४२२७३६७७५

Friday, 12 April 2019

मेंढालेखा एक वैशिष्ट्यपूर्ण गाव

● मेंढालेखा ---  मेंढालेखा हे महाराष्ट्रातील गडचिरोली
जिल्ह्य़ातील एक गाव आहे. हे गाव
जंगलांनी वेढलेले आहे. या गावाने जंगल
व्यवस्थापनाचा इतिहास घडवला. सर्व गाव
आपल्या रोजच्या गरजांसाठी गावाजवळील
जंगलावर पूर्णपणे अवलंबून होते.
        परंतु १९६० - ६१ या दशकात हे जंगल
कागद कंपन्यांना भाडेकराराने देण्यात आले.
कंपन्यांनी अंदाधुंद कटाई चालू केली. त्यामुळे गावकऱ्यांना जंगलातून मिळणाऱ्या गरजेच्या
वस्तू मिळणे अशक्य होऊ लागले. गावकऱ्यांनी
संघर्ष केला. शेवटी स्थानिक लोकांचे
जंगलावरील अधिकार सरकारने मान्य केले.
       गावाने जंगलाच्या वापराविषयी नियम
बनवले. नियम मोडणाऱ्यास दंड बसवण्यात
आला. जंगल व्यवस्थापनासाठी अभ्यासगट
स्थापन झाले. गस्त पथके जंगलांची निगराणी
व संवर्धन करू लागली.
    जंगल व्यवस्थापन आणि संवर्धनाचे सर्व
निर्णय सर्वानुमते ग्रामसभेत घेतले जाऊ
लागले. मेंढालेखाची स्थानिक प्रशासन आणि
निर्णय व्यवस्था जंगल संवर्धनाचा पाया आहे.
संकलक  :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक )
                पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
                ९४२२७३६७७५

Wednesday, 10 April 2019

भारताची सर्वसामान्य माहिती ( सामान्यज्ञान )


(१) भारतातील सर्वात मोठी सोन्याची खाण कोणती   ?

--  कोलार

(२) भारतातील सर्वात लांब लेणी कोणती  ?

---  अजिंठा

(३) भारतातील सर्वात लांब नदी कोणती  ?

---   गंगा

(४) भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते  ?

---  थर   ( राजस्थान )

(५)भारतातील सर्वात मोठे राज्य(क्षेत्रफळाने) कोणते  ?

---  राजस्थान

(६)भारतातील सर्वात मोठे राज्य(लोकसंख्येने) कोणते  ?

---  उत्तरप्रदेश

(७) भारतातील एकूण घटक राज्ये किती  ?

---  २९  (एकोणतीस )

(८)भारतातील एकूण केंद्रशासित प्रदेश किती  ?

---  ७  ( सात )

(९) भारतातील प्रथम महिला पंतप्रधान कोण ?

---  इंदिरा गांधी

(१०)भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण ?

---  श्रीमती प्रतिभाताई पाटील.

(११) भारताचे पहिले पंतप्रधान कोण  ?

---  पंडित जवाहरलाल नेहरू.

(१२) भारताचे पहिले राष्ट्रपती कोण  ?

---  डाॅ.  राजेंद्र प्रसाद.

संकलक  :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक )
                पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
                ९४२२७३६७७५

Tuesday, 9 April 2019

चला मराठी - हिंदी - इंग्रजी शिकूया  !

        ( भाग - २)

  चेंडू मराठीत
  गेंद हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात बाॅल  (ball )
  भिंत मराठीत
  दीवार हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात वाॅल  ( wall )

  टेकडी मराठीत
  पहाडी हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात हिल (hill )
  पडणे मराठीत
  गिरणे हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात फाॅल  (  fall )

  लेखणी मराठीत
  कलम हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात पेन  (pen )
  कोंबडी मराठीत
  मुर्गी  हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात  हेन  ( hen )

  माणूस मराठीत
  आदमी हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात मॅन  ( man )
  दहा मराठीत
  दस हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात टेन  (ten )

  पाऊस मराठीत
  बारिश हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात रेन  ( rain )
  मेंदू मराठीत
  भेजा हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात ब्रेन  ( brain )

  मांजर मराठीत
  बिली हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात कॅट  ( cat )
  उंदीर मराठीत
  चूहा हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात रॅट  ( rat )

  झोपडी मराठीत
  कूटी हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात हट  ( hut )
  कापणे मराठीत
  काटना हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात कट  (cut )

  आई  मराठीत
  माॅ हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात मदर  (mother )
  वडिल मराठीत
  पिता हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात फादर ( father )

  भाऊ मराठीत
  भैय्या हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात ब्रदर  ( brother )
 बहिण मराठीत
  बहन हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात सिस्टर  ( sister )

  सूर्य मराठीत
  सूरज  हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात सन  ( sun )
  पळणे  मराठीत
  भागणे  हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात रन  ( run   )

  समुद्र मराठीत
  सागर हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात  सी  ( sea )
  चहा मराठीत
  चाय हिंदीत
  इंग्रजीत म्हणतात टी ( tea )
 
  लेखक :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक )
                पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
                ९४२२७३६७७५
 
 
 

Monday, 8 April 2019

पाणी ( पाणी म्हणजे जीवन  ! )

      पृथ्वीचा सुमारे ७१ % भाग हा
 पाण्याने व्यापला आहे. समुद्राचे पाणी खारट
असल्याने ते पिण्यासाठी आणि शेतीसाठी
उपयुक्त नसते. नदी, नाले, ओहळ इत्यादींचे
वाहते पाणी जमिनीत मुरते आणि त्यामुळे
जमिनीखाली पाण्याचे स्रोत तयार होतात.
अशा पाण्याला भू - जल म्हणतात.

     विहीर, कूपनलिका, तलाव, नदी हे सर्व पाण्याचे स्रोत आहेत.
  
   ● पाण्याची रूपे  :-
       पृथ्वीवर पाणी तीन अवस्थांमध्ये असते.
विहीर, तलाव, नदी, समुद्र तसेच जमिनीखाली
पाणी द्रवरूपात असते.

      उंच पर्वतांवर बर्फाच्या म्हणजेच स्थायुरूपात पाणी सापडते.

    हवेत वायुरूपात पाणी असते.
    तापमानानुसार पाण्याचे अवस्थांतर घडून
येते.  ० ° से ला (शून्य अंश सेल्सिअसला)
बर्फाचे पाण्यात म्हणजेच स्थायूचे द्रवात, तर
१०० ° से ला पाण्याचे वाफेत म्हणजेच द्रवाचे
वायुरूप अवस्थांतर होते.
        पाण्याचे बाष्पीभवन कोणत्याही
तापमानाला होऊ शकते. उच्च तापमानावर
बाष्पीभवन वेगाने होते.

 ● जलप्रदूषण --
   जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्यात सांडपाणी
किंवा रासायनिक पदार्थ मिसळले, तर ते
पिण्यायोग्य राहत नाही. विशेषतः उद्योगधंद्यात
वापरलेले पाणी जवळपासच्या पाण्याच्या
स्त्रोतात जसेच्या तसे सोडले जाते. त्यामुळे
दूषित होते. याला जलप्रदूषण म्हणतात.
   पृथ्वीचा सुमारे तीन चतुर्थांश भाग पाण्याने
व्यापला असला, तरीही फक्त तीनच टक्केच
पाणी पिण्यासाठी किंवा इतर उपयोगांसाठी
वापरता येते. पाणी ही एक मौल्यवान नैसर्गिक
संपत्ती आहे.  तिचा वापर फारच काळजीपूर्वक
करणे गरजेचे आहे. पाण्याची टंचाई दूर
करण्यासाठी जलव्यवस्थापन करणे गरजेचे
आहे.

संकलन :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक )
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             ९४२२७३६७७५

Saturday, 6 April 2019

सामान्यज्ञान  (भारतीय ऐतिहासिक घडामोडी )

(१) कोणत्या संख्यांचा वापर भारतीयांनी प्रथम केला  ?

--- १ ते ९ हे अंक व  ० ही संख्या यांचा
     वापर भारतीयांनी प्रथम केला.
------------------------------------------------

(२) कोणत्या गणिती संकल्पनेचा शोध भारतीयांनी लावला  ?

---  ० ते ९ या अंकांची एकं,  दहं  अशा
    स्थानानुसार किंमत बदलते, या गणिती
    संकल्पनेचा शोध भारतीयांनी लावला.
-------------------------------------------------

(३) खगोलशास्त्रातील कोणती बाब आर्यभटाने सांगितली ?

---  पृथ्वी सूर्याभोवती फिरते, ही खगोलशास्त्रीय
     बाब आर्यभटाने सांगितली.
--------------------------------------------------

(४) प्राचीन भारतात कोणत्या धातूंपासून  मूर्ती घडवत असत  ?

-- प्राचीन भारतात तांबे व कांस्य या धातूंपासून मूर्ती घडवत असत.
--------------------------------------------------

(५) कोणती जगप्रसिद्ध महाकाव्ये संस्कृत
     साहित्यात निर्माण झाली  ?

--- 'रामायण ' व  ' महाभारत ' ही जगप्रसिद्ध
    महाकाव्य संस्कृत साहित्यात निर्माण झाली.
    
संकलन :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक )
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             ९४२२७३६७७५

Friday, 5 April 2019

मराठी शब्दांची सोप्या भाषेत व्याप्ती

(१) वाटाघाटी --
--- मतभेद मिटविण्यासाठी केलेली बोलणी.

(२) वरमाय --
---  नव-या मुलाची आई.

(३) माथाडी --
---  डोक्यावर ओझे वाहून नेणारा.

(४) पंचवटी --
--- पाच वडांचा समुदाय असलेली जागा.

(५) कळवळणे --
--- असहायपणे विनंती करणे.

(६) चावडी --
--- गावच्या कामकाजाची जागा.

(७)उदयोन्मुख --
--- उदयाला येत असलेला.

(८) परावलंबी --
---  दुसर्‍यावर अवलंबून असणारा.

(९) पोरका --
--- आईवडील नसलेला.

(१०) वरबाप --
----  नव-या मुलाचा बाप.

(११) स्वदेशी --
---  आपल्या देशात तयार होणारे.

(१२) मितभाषी --
---   मोजकेच बोलणारा.

(१३) बिनबोभाट --
---   कोणालाही कळू न देता.

(१४) परस्परावलंबी --
---  एकमेकांवर अवलंबून असणारे.

(१५) बखळ --
---   पडक्या घराची मोकळी जागा.

लेखन :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक )
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             ९४२२७३६७७५

Thursday, 4 April 2019

Say odd  even one.

( गटातील वेगळा शब्द सांगा / ओळखा.)

(1) cock   crow  bull   duck  
---  bull
-------------------------------------------
(2) cow   fox   cat   dog.
---   fox
-------------------------------------------
(3) lion   goat   deer   tiger.
---  goat
-------------------------------------------
(4)  snake    fish   frog   crab
---  snake
-------------------------------------------
(5) hen    ant   bee   bug
---  hen
-------------------------------------------
(6) mango   lemon   fig   lotus.
---  lotus
-------------------------------------------
(7) potato   pea   orange   brinjal.
---  orange.
-------------------------------------------
(8) calf     nest   cave    hole
---  calf
-------------------------------------------
(8) roots   leaf   bud   rice
---  rice
-------------------------------------------
(9) bajra   gram chilli   wheat.
---  chilli
-------------------------------------------
(10)  milk   oil    water   salt.
---  salt
-------------------------------------------
(11) chess    bus   car   boat
---  chess
-------------------------------------------
(12) red    green   blue   pen
---  pen
-------------------------------------------
(13) gold   silver   iron   sugar
---  sugar
-------------------------------------------
(14) ten   ball   Five   six
---   ball
-------------------------------------------
(15) sweet   bitter   salty  pink
---  pink
-------------------------------------------
लेखन :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             ९४२२७३६७७५

Wednesday, 3 April 2019

परिसर अभ्यास - प्रश्नावली (सामान्यज्ञान)

(१) सजीवांचे दोन गट कोणते  ?
---  प्राणी  व  वनस्पती .

(२) दोन पाय असलेले प्राणी सांगा ?
---  कावळा,  माणूस, चिमणी.

(३) चार पाय असलेले प्राणी सांगा  ?
---  कुत्रा,  बेडूक, वाघ, सरडा.

(४) पाय नसलेले दोन प्राणी सांगा  ?
---  साप,  गांडूळ, मासा.

(५) आठ पाय असणारा प्राणी सांगा  ?
---  कोळी

(६ ) वनस्पतीच्या अवयवांची नावे सांगा  ?
---  मूळ, खोड,  पान,  फूल,   फळ .

(७) एक बी असलेली फळे कोणती  ?
---  आंबा,  आवळा, जांभूळ,  बोरे.

(८) अनेक बिया असलेली फळे सांगा  ?
---  कलिंगड,  पेरू,  चिकू,  सीताफळ.

(९) जलचर प्राण्यांची नावे सांगा  ?
---  मासा, कासव, बेडूक.

(१०) कीटकांची नावे सांगा  ?
---  माशी,  झुरळ,  ढेकूण, मुंगी.

(११) धान्यांची नावे सांगा  ?
---  गहू , ज्वारी, बाजरी, मका, भात.

(१२) मसाल्याची पिके सांगा  ?
---  लसूण,  जिरे, ओवा, हळद.

(१३) धातूंची नावे सांगा  ?
---  सोने,  चांदी,  तांबे, लोखंड.

(१४) थंड हवेची ठिकाणे सांगा  ?
---  महाबळेश्वर, माथेरान, तोरणमाळ

(१५)गरम पाण्याच्या झ-याची ठिकाणे सांगा ?
---  वज्रेश्वरी,  उपनदेव,  उन्हवरे.

(१६) किल्ल्यांची नावे सांगा  ?
---  रायगड, जंजिरा, प्रतापगड.

(१७) लेण्यांची स्थळे सांगा  ?
---  अंजिठा,  वेरूळ, घारापुरी.

(१८) महाराष्ट्रातील लोहमार्ग जंक्शन सांगा  ?
---  मनमाड,  भुसावळ, मुंबई, पुणे.

(१९) महाराष्ट्रातील मिठागरांची ठिकाणे सांगा ?
---  वसई,  भाईंदर, डहाणू.

(२०) महाराष्ट्रातील प्रमुख नद्या सांगा  ?
---  गोदावरी, तापी, नर्मदा, कृष्णा.

(२१) कोकणातील प्रसिद्ध फळे सांगा  ?
---  नारळ, सुपारी, आंबा.

संकलक  :- शंकर सिताराम चौरे  (प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर ता. साक्री जिल्हा धुळे
             ९४२२७३६७७५