ब्लॉग भेटी.
Friday, 23 October 2020
मराठी व्याकरण -- काळ ओळखा.
● क्रिया चालू असते, तेव्हा क्रियापद वर्तमानकाळी असते.
● क्रिया पूर्वी झालेली असते, तेव्हा क्रियापद भूतकाळी असते.
● क्रिया पुढे व्हायची असते, तेव्हा क्रियापद भविष्याकाळी असते.
>>> खालील वाक्यांचा काळ ओळखा.
(१) सुप्रिया पुस्तक वाचते.
उत्तर -- वर्तमानकाळ
(२) सुमितने पुस्तक वाचले.
उत्तर -- भूतकाळ
(३) चंदना पुस्तक वाचील.
उत्तर -- भविष्यकाळ
(४) शंकर चित्र काढतो.
उत्तर -- वर्तमानकाळ
(५) धिरजने चित्र काढले.
उत्तर -- भूतकाळ
(६) आदित्य चित्र काढील.
उत्तर -- भविष्यकाळ
(७) सानिया साखर खाते.
उत्तर -- वर्तमानकाळ
(८) सृष्टीने साखर खाल्ली.
उत्तर -- भूतकाळ
(९) रोहिणी साखर खाईल.
उत्तर -- भविष्यकाळ
(१०) ताई शाळेत जाते.
उत्तर -- वर्तमानकाळ
(११) माई शाळेत गेली.
उत्तर -- भूतकाळ
(१२) बाई शाळेत जाईल.
उत्तर -- भविष्याकाळ
(१३) आम्ही अभ्यास करतो.
उत्तर -- वर्तमानकाळ
(१४) आम्ही अभ्यास केला.
उत्तर -- भूतकाळ
(१५) आम्ही अभ्यास करू.
उत्तर -- भविष्यकाळ
(१६) पंडित नेहरू भारताचे पंतप्रधान होते.
उत्तर -- भूतकाळ
(१७) उद्या आमची सहल जाईल.
उत्तर -- भविष्यकाळ
(१८) मी अभ्यास करतो.
उत्तर -- वर्तमानकाळ
(१९) गाय चारा खाते.
उत्तर -- वर्तमानकाळ
(२०) म्हैस चारा खाईल.
उत्तर -- भविष्यकाळ
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा , केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे ...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
No comments:
Post a Comment