ब्लॉग भेटी.
Thursday, 22 October 2020
शब्दासाठी योग्य अर्थ असलेला शब्दसमूह
(१) जलचर
--- पाण्यात राहणारे प्राणी.
(२) गायक
--- गाणे गाणारा.
(३) कवी
--- कविता करणारा / रचणारा.
(४) आखाडा
--- कुस्ती खेळण्याची जागा.
(५) तुरुंग
--- कैदी ठेवण्याची जागा.
(६) अतिवृष्टी
--- खूप पाऊस पडणे.
(७) वावटळ
--- गोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा.
(८) तबेला
--- घोडे बांधण्याची जागा.
(९) चौक
--- चार रस्ते एकत्र येतात ती जागा.
(१०) नावाडी
--- होडी चालवणारा.
(११) मदारी
--- माकडाचा खेळ करून दाखविणारा.
(१२) साक्षर
--- लिहिता - वाचता येणारा.
(१३) निरक्षर
--- लिहिता - वाचता न येणारा.
(१४) वैमानिक
--- विमान चालवणारा.
(१५) व-हाडी
--- लग्नासाठी जमलेले लोक.
(१६) नाटककार
--- नाटक लिहिणारा.
(१७) वार्ताहर
--- बातमी आणून देणारा / देणारी.
(१८) मूर्तिकार
--- मूर्ती बनवणारा.
(१९) शिलालेख
--- दगडावर कोरलेले लेख.
(२०) कवयित्री
--- कविता करणारी / रचणारी
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे ...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
No comments:
Post a Comment