ब्लॉग भेटी.
Monday, 12 October 2020
भौगोलिक प्रश्नावली ( एका शब्दात उत्तर सांगा )
(१) सूर्य काय आहे ?उत्तर -- तारा
(२) सूर्यमालेतील एकमेव तारा कोणता ?
उत्तर -- सूर्य
(३) सूर्यापासून आपणास कोणती गोष्ट मिळते ?
उत्तर -- प्रकाश
(४) चंद्राला प्रकाश कोणापासून मिळतो ?
उत्तर -- सूर्यापासून
(५) पृथ्वी कशी आहे ?
उत्तर -- गोल
.
(६) आपण कोणत्या ग्रहावर राहतो ?
उत्तर -- पृथ्वी
(७) पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा कोणता ?
उत्तर -- सूर्य
(८) पृथ्वीला प्रकाश कोठून मिळतो ?
उत्तर -- सूर्यापासून
(९) पृथ्वी कोणाभोवती फिरते ?
उत्तर -- सूर्याभोवती
(१०) चंद्र अजिबात दिसत नाही, त्या रात्रीला कोणती रात्र म्हणतात ?
उत्तर -- अमावास्येची
(११) ज्या रात्री चंद्र पूर्ण गोल दिसतो , त्या रात्रीला
कोणती रात्र म्हणतात ?
उत्तर -- पौर्णिमेची
(१२) सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यतच्या काळाला काय
म्हणतात ?
उत्तर -- रात्र
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा ,केंद्र रोहोड
ता. साक्री जि धुळे
९४२२७३६७७५
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे ...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
No comments:
Post a Comment