ब्लॉग भेटी.
Friday, 2 October 2020
समानार्थी शब्द / विरूध्दार्थी शब्द प्रश्नावली
(१) ' पाणि ' या शब्दाचा अर्थ काय आहे ?उत्तर -- हात
(२) ' मूषक ' या शब्दाचा अर्थ सांगा.
उत्तर -- उंदीर
(३) ' जतन ' या शब्दास समानार्थी शब्द सांगा.
उत्तर -- संगोपन
(४) ' अंक ' या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणते ?
उत्तर - आकडा, मांडी
(५) ' धनुष्य ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा .
उत्तर -- कोदंड
(६) ' दीन ' या शब्दाला समानार्थी शब्द सांगा.
उत्तर -- गरीब
(७) ' मंडूक ' या शब्दाला समानार्थी शब्द सांगा.
उत्तर -- बेडूक
(८) ' वसन ' या शब्दाला समानार्थी शब्द सांगा.
उत्तर -- कपडा
(९) ' दंडक ' या शब्दाचा अर्थ सांगा.
उत्तर -- नियम
(१०) ' सज्ञान ' या शब्दास समानार्थी शब्द सांगा.
उत्तर -- सुज्ञ
(११) ' समशेर ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
उत्तर -- तलवार
(१२) ' मुख्य ' या शब्दास समानार्थी शब्द सांगा.
उत्तर -- प्रमुख
(१३) ' अतिथि ' या शब्दाला समानार्थी शब्द सांगा.
उत्तर -- पाहुणा
(१४) ' क्षीर ' या शब्दाला समानार्थी शब्द सांगा.
उत्तर -- दूध
(१५) ' जहाल ' या शब्दाला विरूध्दार्थी शब्द सांगा.
उत्तर -- मवाळ
(१६) ' वृध्द ' या शब्दाच्या विरूध्दार्थी शब्द सांगा.
उत्तर -- तरूण
(१७) ' दोषी ' या शब्दाच्या विरूध्दार्थी शब्द सांगा.
उत्तर -- निर्दोष
(१८) ' आपला ' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द सांगा.
उत्तर -- परका
(१९) ' दुष्काळ ' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द सांगा.
उत्तर -- सुकाळ
(२०) ' सम ' या शब्दाच्या विरूध्दार्थी शब्द सांगा.
उत्तर -- विषम
==================================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र - रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे ...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
No comments:
Post a Comment