ब्लॉग भेटी.
Saturday, 10 October 2020
म्हणी ( मराठी भाषिक म्हणी )
(१) अती तेथे माती.
(२) अति शहाणा त्याचा बैल रिकामा.
(३) अडला हरी गाढवाचे पाय धरी.
(४) अंथरूण पाहून पाय पसरावे.
(५) इकडे आड, तिकडे विहीर.
(६) ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये.
(७) एका हाताने टाळी वाजत नाही.
(८) ऐकावे जनाचे करावे मनाचे.
(९) कर नाही त्याला डर कशाला ?
(१०) करावे तसे भरावे.
(११) कामापुरता मामा.
(१२) काखेत कळसा गावाला वळसा.
(१३) गरजवंताला अक्कल नसते.
(१४) गर्वाचे घर खाली.
(१५) गरज सरो वैद्य मरो.
(१६) गोगलगाय नि पोटात पाय.
(१७) घरोघरी मातीच्या चुली.
(१८) पाण्यात राहून माशाशी वैर करू नये.
(१९) डोंगर पोखरून उंदीर काढणे.
(२०) देश तासा वेश.
(२१) दोघांचे भांडण, तिस-याचा लाभ.
(२२) नव्याचे नऊ दिवस.
(२३) नाचता येईना ( म्हणे ) अंगण वाकडे.
(२४) नावडतीचे मीठ अळणी.
(२५) नाव मोठे लक्षण खोटे .
(२६) पालथ्या घागरीवर ( घड्यावर ) पाणी.
(२७) पाचही बोटे सारखी नसतात.
(२८) बळी तो कान पिळी.
(२९) बैल गेला नि झोपा केला.
(३०) भीक नको ; पण कुत्रा आवर.
(३१) मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.
(३२) वासरांत लंगडी गाय शहाणी.
(३३) रात्र थोडी सोंगे फार.
(३४) रोज मरे त्याला कोण रडे.
(३५) लहान तोंडी मोठा घास.
(३६) लेकी बोले सुने लागे.
(३७) शितावरून भाताची परीक्षा.
(३८) सरड्याची धाव कुंपणापर्य॔त.
(३९) हत्ती गेला नि शेपूट राहिले.
(४०) थेंबे थेंबे तळे साचे.
===============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री जि धुळे
९४२२७३६७७५
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे ...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
No comments:
Post a Comment