माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 10 June 2023

सामान्य विज्ञान ( कारणे सांगा. )


(1) '0' या रक्तगटाला 'सार्वत्रिक दाता' म्हणतात. 
उत्तर :-  '0' या रक्तगटाचे रक्त सर्व रक्तगटांच्या रुग्णांना
 देता येते. म्हणून '0' रक्तगटाला 'सार्वत्रिक दाता' म्हणतात.
----------------------------------
(2) ‘AB' रक्तगटाला सर्वग्राही म्हणतात.
उत्तर :-  ‘AB' रक्तगटाची व्यक्ती कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीकडून रक्त घेऊ शकते, म्हणून ‘AB' रक्तगटाला 
सर्वग्राही म्हणतात.
----------------------------------
(3) रहदारीच्या रस्त्याकडेची झाडांची पाने मळकट का दिसतात? 
उत्तर :-  वाहनांतून निघणाऱ्या कार्बन डायऑक्साइडमुळे 
आणि धुळीमुळे रहदारीच्या रस्त्याकडेच्या झाडांची पाने मळकट दिसतात.
----------------------------------
(4) उन्हात क्रिकेट खेळताना पांढरे कपडे का घालतात ? उत्तर :-  पांढरे कपडे उष्णता शोषून घेत नाहीत. म्हणून 
उन्हात क्रिकेट खेळताना पांढरे कपडे घालतात.
----------------------------------
(5) सौर चुलीतील भांड्यांना बाहेरून काळा रंग का असतो? 
उत्तर : काळा रंग जास्त उष्णता शोषून घेतो, म्हणून सौर चुलीतील भांड्यांना बाहेरून काळा रंग असतो.
==========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775 ‌ /  7721941496

No comments:

Post a Comment