✓ प्रश्न संच -- १
(१) तुझे नाव काय आहे ?
(२) तुझ्या वडिलांचे नाव काय ?
(३) तुझे आडनाव काय आहे ?
(४) तुझ्या भावाचे नाव काय ?
(५) तुझ्या बहिणीचे नाव काय ?
----------------------------------
✓ प्रश्न संच -- २
(१) तुला किती भाऊ आहेत ?
(२) तुझ्या आईचे नाव सांग.
(३) तुला किती बहिणी आहेत ?
(४) तुझ्या मामाचे गाव कोणते ?
(५) तुझ्या घरातील माणसे किती ?
----------------------------------
✓ प्रश्न संच -- ३
(१) तुझ्या शाळेचे नाव काय ?
(२) तू कोणत्या वर्गात शिकतोस ?
(३) तुझ्या गुरुजींचे / मॅडमचे नाव काय ?
(४) तुझ्या मित्राचे नाव काय ?
(५) तुझ्या शाळेचे मुख्याध्यापक कोण आहेत
----------------------------------
✓ प्रश्न संच -- ४
(१) शाळा किती वाजता भरते ?
(२) शाळा किती वाजता सुटते ?
(३) तुम्ही शाळेत कोणकोणते खेळ शिकलात ?
(४) तुम्हांला शाळेत खेळ कोण शिकविते ?
(५) तुला कोणता खेळ आवडतो ?
----------------------------------
✓ प्रश्न संच -- ५
(१) फळ्याचा रंग कोणता ?
(२) घंटा कशी वाजते ?
(३) तुझ्या दप्तरात काय ठेवले आहे ?
(४) कोणत्या वारी शाळेला सुटी असते ?
(५) तू कोणत्या इयत्तेत शिकतोस ?
----------------------------------
✓ संच --- ६
(१) तुझ्या गावाचे नाव काय ?
(२) आपले गाव कोणत्या तालुक्यात आहे ?
(३) आपले गाव कोणत्या जिल्ह्यात आहे ?
(४) आपले गाव कोणत्या राज्यात आहे ?
(५) आपल्या देशाचे नाव काय आहे ?
----------------------------------
✓ संच --- ७
(१) कावळ्याचा रंग कोणता ?
(२) पोपटाचा रंग कोणता ?
(३) कावळा कसा ओरडतो ?
(४) दूध देणारे प्राणी कोणते ?
(५) पहाटे कोण आरवतो ?
=======================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६
No comments:
Post a Comment