माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

3284681

Monday, 18 March 2024

मी पाहिलेली चिऊताई (चिमणी)


   चिमणीचा चिवचिवाट न ऐकलेला माणूस विरळच म्हणवा लागेल. अगदी तान्ह्या बाळाला सुध्दा 'चिऊताई' माहीत असते. रात्रीच्या वेळी थव्यांनी एकत्र राहणा-या चिमण्या दिवसा जोडीजोडीने किंवा छोट्या थव्यांनी खाद्य शोधत हिंडतात. दुपारी मात्र थोडी विश्रांती घेतात.
      करड्या रंगाच्या या इटुकल्या चिमण्या नेहमी कामात असतात. एकतर वर्षातून तीन - चार वेळा वीण होते. त्यामुळे घरट्यात नेहमीच पिल्लं वाढत असतात. पिल्लांचं खांद्य म्हणजे छोटे कीटक आणि अळ्या. त्या पकडून आणणं, भरवणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरटं स्वच्छ करणं या कामामध्ये चिमण्या दंग असतात. बारकाईनं बघा चिमण्या - चिमणीत फरक असतो.
    अधूनमधून दाणे टिपणा-या ह्या छोट्या चिमण्या पिकांवर येणारे कीटक, आणि त्यांच्या अळ्या खाऊन शेतक-यांना फार मदत करतात. मूर्ती लहान पण कीर्ती महान असंच काहीसं म्हणता येईल. आपल्या चिऊताई बद्दल !

२० मार्च जागतिक चिमण्या दिवस निमित्त लेख...
-------------------------------------------------
लेखन ‌:- शंकर सिताराम चौरे (प्रा.‌शिक्षक‌ )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा 
केंद्र -- रोहोड, ता.‌साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

No comments:

Post a Comment