पुस्तक प्रकाशनाचा उधळला रंग
पुस्तक रूपी उपक्रमात
तीन महिने होतो दंग
नवी दिशा, नवे उपक्रम समूहात
ताई - भाऊंची जोड
चव्हाण सरांच्या मार्गदर्शनाने
प्रकाशन सोहळा झाला गोड
शतक नाविन्यपूर्ण उपक्रमांचे
गुणगाऊ मनोभाव
देवराव चव्हाण सरांनी
मार्गदर्शन केलं प्रेमभाव
शतक नाविन्यपूर्ण उपक्रमात
ज्ञानाची आहे गमंत
भाषा, गणित, विज्ञान आणि
सामान्यज्ञानाची संगत
बळीराम जाधव सरांच्या मनात
सोज्वळतेचा दिवा
शतक नाविन्यपूर्ण उपक्रम
पुस्तक रूपाने लाभला ठेवा.
शतक नाविन्यपूर्ण उपक्रम
पुस्तक ज्ञानरूपी दर्पण.
आपण सर्व उपक्रमशील शिक्षकांनी
ज्ञान केलं अर्पण.
शतक नाविन्यपूर्ण उपक्रम
ज्ञानसागराची किनार
आपण सर्व दिलं एकमेकांना
मनापासून आधार
शतक नाविन्यपूर्ण उपक्रमाला
आज आली शोभा
बळीराम जाधव सरांच्या रूपाने
मार्गदर्शक उभा.
शतक नाविन्यपूर्ण उपक्रम
ज्ञानरूपी सोनेरी कळस
या सोहळ्यात नाही
नाही वाटलं आळस.
शतक नाविन्यपूर्ण उपक्रम
अप्रतिम सुंदर
कर्तृत्ववान भाऊ - ताईंची
पुरस्काराने झाली कदर.
शतक नाविन्यपूर्ण उपक्रमात
गुरूजनं कुशल
उपक्रम, सामान्यज्ञानाची
दिशा आहे स्पेशल.
शतक नाविन्यपूर्ण उपक्रम
आहे पवित्र
या पुस्तकातील उपक्रम
सादर होतील सर्वत्र
इंग्रजी भाषेत चंद्रला
म्हणतात मून
शतक नाविन्यपूर्ण उपक्रमात
सप्तरंगी गुण
============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६
No comments:
Post a Comment