माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Monday, 4 March 2024

सामान्य ज्ञान कसोटी


(1)  एका 30 मीटर लांबीच्या कापडातून रोज 3 मीटर कापडाचा तुकडा कापला तर ते कापड कापायला किती दिवस लागतील ?

उत्तर --- 9 दिवस 
----------------------
(2) जर डाॅक्टरांनी तुम्हांला 6 गोळ्या दर अर्ध्या तासाने एक प्रमाणे घ्यायला सांगितल्या तर त्या सर्व संपण्यासाठी तुम्हाला
किती वेळ लागेल ?

उत्तर ---  2 तास 30 मिनिटे 
----------------------------------
(3) एका 30 मीटर लांबीच्या कापडातून रोज 6 मीटर कापड कापले जात असेल तर ते पूर्ण कापड कापायला किती दिवस लागतील ?

उत्तर ---  4 दिवस 
-----------------------------------
(4) जर एक साडी वाळायला 10 मिनिटे लागत असतील तर अशा 10 साड्या वाळायला किती वेळ लागेल ?

उत्तर --- 10  मिनिटे 
-----------------------------------
(5) लिंबू , वाटाणा, कलिंगड, मोसंबी व मोहरी योग्य क्रमाने लावल्यास मधोमध काय असेल ?

उत्तर --- लिंबू 
-------------------------------------
(6) एका  20 मीटर लांबीच्या कापडातून रोज 2 मीटर कापडाचा तुकडा कापला तर ते पूर्ण कापड कापायला किती दिवस लागतील ?

उत्तर --- 9 दिवस 
------------------------------------
(7) एका दिवसाचे तास व अशोक चक्रातील आ-यांची संख्या यांचा संबंध काय ?

उत्तर --- दोन्हींची संख्या समान आहे.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775  / 7721941496

No comments:

Post a Comment