माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Tuesday, 26 March 2024

मनोरंजक यमक शब्द साखळी ( भाषिक उपक्रम )


✓उपक्रमाचा हेतू :
१) विद्यार्थ्यांना मराठी वाचन-लेखनाची आवड निर्माण करणे.
२) यमक जुळणाऱ्या शब्दांची ओळख होणे.
३) वि‌द्यार्थी कविता स्वनिर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या शब्दांचा परिचय होणे.
४) आनंददायी भाषिक उपक्रमातून शिक्षण देणे.

✓कृती
1) उपक्रम सुरु करण्यापूर्वी मराठी यमक जुळणाऱ्या शब्दजोड्‌या दोन अक्षरी शब्द, तीन अक्षरी शब्द, चार अक्षरी शब्द संग्रहित करावे.
२) संग्रहित केलेल्या यमक जुळणाऱ्या शब्द जोड्यांचे संच तयार करून घ्यावे.

१) घर वर तर थर धर जर नर
२) गड वड धड जड़ कह घड़ थड
३) घट-पट नट फट गट अट भट
४) कळ नळ पळ मळ वळ बळ गळ
५) मन धन सन वन तन घन बन
६) धरण हरण वरण चरण करण सरण मरण
७) कान मान छान पान रान जान धान
८) नाक चाक ताक हाक बाक आक पाक
९) गार दार खार धार चार धार हार
१०) हात दात जात भात रात सात वात
११) शाल लाल गाल काल ढाल पाल साल
१२) आग नाग बाग राग साग डाग भाग
१३) घास खास डास तास पास वास रास
१४) झाड माड आड जाड ताड नाङ धाड
१५) गाव नाव भाव धाव डाव चाव पाव
१६) साप ताप छाप पाप बाप शाप माप
१७) वाट घाट पाट ताट लाट भाट थाट
१८) बाळ लाळ डाळ काळ गाळ माळ टाळ
१९) ससा बसा हसा रसा घसा ठसा वसा
२०) धडा वडा सड़ा कड़ा खड़ा घड़ा तडा
२१) वारा तारा चारा बारा धारा खारा सारा
२२) शाळा बाळा माळा काळा जाळा आळा वाळा
२३) बालक पालक मालक चालक / गायक  लायक
२४) घागर जागर सागर / भाकर चाकर ठाकर
२५) कळी अळी खळी नळी मळी बळी तळी
२६) आई बाई माई ताई दाई शाई जाई
२७) पूर दूर सूर धूर तूर खूर भूर
२८) वारे तारे सारे खारे घारे आरे भारे
२९) मोर बोर चोर थोर पोर दोर कोर
३०) होळी पोळी मोळी झोळी टोळी कोळी गोळी

✓३) यमक जुळणाऱ्या शब्दांचे कार्ड तयार करणे.
४) दर शनिवारी यमक जुळणाऱ्या शब्द कार्डाचे वाचन करून घ्यावे.
५) यमक जुळणाऱ्या शब्द वाचनाचे मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग करून ती ऐकविण्यात यावी.
६) यमक जुळणाऱ्या शब्द वाचनाची गोडी निर्माण होऊन छोट्या छोट्या चारोळ्या किंवा कविता रचना करण्यास प्रोत्साहन द्यावे.

✓ फलश्रुति /निष्पत्ति :-

१) विद्यार्थी मराठी यमक जुळणाऱ्या शब्दांचे वाचन लेखन आवडीने करू लागतात.
२) या शब्द संग्रहामुळे स्वनिर्मितीचा आनंद वि‌द्यार्थ्यांना मिळतो.
३) यमक जुळणाऱ्या शब्द‌जोड्या नवनवीन शोधण्यातून शोधक वृत्ती वाढते.
४) काव्य निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या यमक शब्दांची मदत होते.
=========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५  / ७७२१९४१४९६

No comments:

Post a Comment