माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Sunday, 15 February 2026

आदिवासी संस्कृती रक्षण प्रतिज्ञा

-- मी अशी प्रतिज्ञा करतो की,
माझ्या महान आदिवासी संस्कृतीचा, 
रूढी परंपरांचा आणि भाषेचा मान 
राखीन व संवर्धन करीन.
-- माझ्या निसर्ग देवतांची, आदिवासी 
धर्माची, आदिवासी क्रांतिकारकांच्या 
इतिहासाची आणि आदिवासी संस्कृतीची 
कोणत्याही प्रकारे हानी होऊ देणार नाही.
-- मी माझ्या आदिवासी समाजातील 
विचारांचे आणि मूल्यांचे पालन करीन. 
आदिवासी समाजातील एकता, बंधुता 
आणि आदर टिकवून ठेवण्यासाठी मी 
नेहमी प्रयत्नशील राहीन.
-- तसेच जल, जंगल, जमिन पर्यावरणाचे 
रक्षण करीन. मी माझ्या गौरवशाली 
आदिवासी संस्कृतीचा सदैव अभिमान 
बाळगीन.

--- जय आदिवासी, जय डोंग-यादेव ---
========================
---- शंकर चौरे सर ---

No comments:

Post a Comment