माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 14 February 2026

आदिवासी कोकणी भाषा शिकूया

चल ग निशा
चल ग उषा
आपण शिकू कोकणी भाषा ॥ धृ ॥
म्हाता-याला डोसा नि
मुलाला पोसा
म्हातारीला डोसी नि
मुलीला पोसी

'आई' ला आया नि
बहिणीला बया
काकाला नाना नि
काकूला नानी

'इकडे ' ला अंग नि
'तिकडे ' ला तंग
'माझा' ला मान्हा नि
'तुझा ' ला तुन्हा 

लहान ला धाकला नि
'एकटा ' ला यखला
'झोपे ' ला निज नि 
कशाला 'कज

' भांडण' ला कळ नि
' वेळे' ला येळ
येथेला अठं नि
तेथेला तठ 

'मजा' ला मज्या नि
'भजी' ला भज्या
'कसे' ला कश्या नि
असे ' ला अश्या

'विंचू' ला इच्चू नि
' मटण ला चिच्चू
'बाजार' ला बजार नि
'आत' ला मझार

'माकड' ला केल्या नि
'शिष्य' ला चेल्या
'पक्षी' ला चिडू नि
'सोबत्याला भिडू

----------- कवि :- शंकर चौरे सर
काकरपाडा ( गोटाळ आंबा) ता. साक्री, जि. धुळे 
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

No comments:

Post a Comment