बया सांग आयाला
शाळमं टाक जयाला ॥धृ॥
डोसा सांग डोशीला
पाटी आण पोसीला ॥१॥
दादा सांग वहिनीला
वही आण बहिणीला ॥२॥
नाना सांग नानीला
पेन आण राणीला ॥३॥
मामा सांग मामीला
कपडा आण भाचीला ॥४॥
चिऊ सांग काकाला
दप्तर आण आक्काला ॥५॥
बाबा सांग ताऊला
पैसा दे खाऊला ॥६॥
आजा धरं काठीला
शिकाडा मानी बेटीला ॥७॥
------- कवी :- शंकर चौरे सर
काकरपाडा ( गोटाळ आंबा ) ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६
No comments:
Post a Comment